Onam Pookalam Video Viral : महाराष्ट्रामध्ये नुकताच १० दिवसांचा गणेशोत्सव उत्साहात पार पडला याच कालावधीत केरळमध्ये १० दिवस ओणम सण साजरा केला जातो. ओणम हा मल्याळी लोकांचा सण आहे. ओणम म्हटलं की अनेकांना नदी किंवा तळ्यात होणाऱ्या बोटींच्या शर्यती आठवतात. या सणाचे मुख्य आकर्षण असते पुक्काळम् (फुलांची रांगोळी) . प्रत्येक घरासमोरील अंगण शेणाने सारवले जाते आणि त्यावर फुलांची रांगोळी काढण्यात लहान मुलं हरवून जातात. सकाळी सकाळी लवकर उठून लहान मुले आधी फुले गोळा करतात. पहिल्यादिवशी काढलेल्या फुलांच्या रांगोळीत भर टाकत दहाव्या दिवशीपर्यंत भली मोठी रांगोळी तयार केली जाते. मल्याळी लोकांसाठी ओणम सणाप्रमाणेच या फुलांच्या रांगोळीचं महत्त्वही खूप असते. पण याच रांगोळीचा अवमान केल्याची धक्कादायक घटना नुकतीच बंगळुरू येथे घडली आहे.

बेंगळुरू येथील एका अपार्टमेंट कॉम्प्लेक्समधील रहिवाशांनी ओणम साजरा करण्यासाठी लहान मुलांनी पुक्काळम् (फुलांची रांगोळी) तयार केली. पण एका महिलेने ही रांगोळी नष्ट केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना पूर्व बंगळुरूच्या हेगडे नगरमधील मोनार्क सेरेनिटी अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या सार्वजनिक परिसरामध्ये घडली. महिलेचे हे कृत्य पाहून रहिवाशांना धक्का बसला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनाही महिलेच्या कृतीवर रोष व्यक्त केला.

'Gir Mat Jaana': Viral MP Woman's Dance Fails To Impress Netizens funny video goes viral
गावच्या महिलेचा ट्रेंडिंग गाण्यावर तुफान डान्स; मारल्या अशा स्टेप की VIDEO पाहून पोट दुखेपर्यंत हसाल
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Two girls fighting at collage over a guy shocking video viral on social media
प्रेमासाठी काय पण! एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
hemal ingle bridal to be party
Video : ‘नवरा माझा नवसाचा २’ फेम अभिनेत्री लवकरच अडकणार विवाहबंधनात, मैत्रिणींसह केली Bride To Be पार्टी
Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर
sai godbole brand ambassador of the apple company
मराठी अभिनेत्रीची लेक झाली ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर! आईसाठी अभिमानास्पद क्षण; म्हणाली, “लॉस एंजेलिस येथे…”
Muslim father card printed for hindu people at daughter wedding faces of hindu lord in amethi goes viral
PHOTO: मुस्लिम बापाकडून लेकीच्या लग्नात हिंदूंसाठी खास निमंत्रण; पत्रिकेवरील एका गोष्टीनं वेधलं लक्ष; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव

व्हायरल व्हिडिओ येथे पाहा

व्हायरल व्हिडीओमध्ये काय आहे?

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते की,”एक महिला सोसायटीतील रहिवाशांबरोबर वाद घालताना दिसत आहे. सोसायटीतील सभासदांबरोबर भांडताना ही महिला आधी रांगोळीवर उभी राहते आणि शेवटी ही महिला (पुक्काळम् )रांगोळी थेट पायाने विस्कटते. २.२० मिनिटाच्या व्हिडीओमध्ये ही महिला मल्यालम आणि इंग्रजी भाषेत बोलत आहे.

ही घटना नेमकी कोणत्या कारणांमुळे घडली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ओणम सणाचा एक महत्त्वाचा भाग असलेला (पुक्काळम् ) हा आनंद आणि एकतेचे प्रतिक आहे. पण ती नष्ट केल्यामुळे महिलेवर सर्वांनी रोष व्यक्त केला आहे.

हेही वाचा – १९९१ मधील पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक कशी होती माहितीये का? पाहा Viral Video

व्हायरल पोस्टमध्ये काय लिहिले आहे?

एक्सवर(पूर्वीचे ट्विटर) karnatakaportf या खात्यावर हा व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “ते खरेच निर्लज्ज वर्तन होते! बेंगळुरूमधील मोनार्क सेरेनिटी अपार्टमेंट कॉम्प्लेक्समधील रहिवासी असलेल्या महिलेने ओणम साजरा करण्यासाठी सार्वजनिक भागातील लहान मुलांनी काढलेली

फुलांची रांगोळी मुद्दाम नष्ट केलेी. हे कृत्य केवळ मुलांच्या परंपरा आणि प्रयत्नांबद्दल आदर नसणेच दर्शवत नाही तर ओणम सारख्या घटनांना प्रोत्साहन देण्यासाठी समाजाची भावना देखील कमी करते. पुक्काळम् एक सुंदर फुलांची रांगोळी असते ज्याला महत्त्वपूर्ण सांस्कृतिक मूल्य आहे आनंद आणि उत्सवाचे प्रतीक मानले जाते. समाजाला आनंद देणारी एखादी गोष्ट उध्वस्त करण्याचे निवडून, तिने इतरांच्या भावनांबद्दल निरादर केला आहे. अशा कृती पाहणे निराशाजनक आहे, विशेषत: जेव्हा त्या अशा एखाद्या व्यक्तीकडून येतात ज्याने अतिपरिचित क्षेत्रामध्ये सुसंवाद आणि सर्वसमावेशकतेचा प्रचार केला पाहिजे.आपले जीवन समृद्ध करणाऱ्या विविध संस्कृती आणि परंपरांचा आदर करण्याच्या महत्त्व याची आठवण करून देणारी ही घटना आहे.”

हेही वाचा – पुण्यातील रिक्षाचालकांची हद्दचं झाली रावं! रिक्षा चालवताना घडलं असं काही जे पाहून पुणेकरांना आवरेना हसू, पाहा Viral Video

नेटकऱ्यांनी व्यक्त केला रोष

एका एक्स वापरकर्त्याने व्हिडिओवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, “भारतीय संस्कृतीतून ही महिला काहीच शिकली नाही की, आपले शेजारी आपले कुटुंब आहे.”

बरेच वापरकर्ते अपार्टमेंट असोसिएशनला औपचारिक कारवाई करण्यासाठी कॉल करत आहेत, काहींनी महिलेच्या वर्तनाबद्दल पोलिस तक्रार दाखल करण्याचे सुचवले आहे.

अलीकडील एका घटनेत बंगळुरूमधील एका महिलेने ओणम सणाच्या वेळी तिच्या किराणा ऑर्डरसह विनामूल्य फुलांचा समावेश केल्याबद्दल ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म बिगबास्केटबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे Twitter) वर टीका केली. त्यांनी म्हटले की, कंपनीने तिच्या खरेदीबरोबर गिफ्ट म्हणून फुले का दिली आहेत”

महिलेची पोस्ट त्वरीत व्हायरल झाली आणि ऑनलाइन चर्चेला उधाण आले. काहींना फुकटची फुलं मिळण्याबाबत कोणाला काय हरकत असू शकते आहे असा प्रश्न केला.