नवरा-बायकोच्या संसारात मतभेद निर्माण झाले की, घटस्फोट घेण्याचा निर्णय घ्यायलाही काही जण घाबरत नाहीत. मनात संशयाची पाल चुकचुकल्यावर नात्यात दुरावा व्हायला वेळ लागत नाही. लग्न झाल्यानंतर सुखाचा संसार-प्रपंच करावा असं सर्वांनाच वाटतं. पण संसाराच्या शिदोरीत एखाद्या गोष्टीची कमी पडली की अनेकांच्या प्रेमसंबंध बिघडतात. घटस्फोट झाल्यानंतर जीवनातील दोघांसाठी खडतर होतो. पण एका महिलेनं घटस्फोट झाल्यानंतर मानसिक तणावात न राहता चक्क मुक्ती दिनच साजरा केला आहे. शास्वती शिवा असं या महिलेचं नाव असून ती बंगळुरु येथील रहिवाशी आहे. चार वर्षांपूर्वी घटस्फोट झाल्यानंतर तिने स्वतंत्रपणे जगलेलं आयुष एका पोस्टच्या माध्यमातून शेअर केलं आहे. लिंकडिनवर तिने ही पोस्ट शेअर केली असून घटस्फोटानंतर मी चौथा मुक्ती दिन साजर करत असल्याचं तिनं म्हटलं आहे. ही पोस्ट वाचल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे.
Viral News : चार वर्षांपूर्वी घटस्फोट घेतलेली महिला दरवर्षी साजरा करते ‘मुक्ती दिन’
चार वर्षांपूर्वी घटस्फोट झाल्यानंतर मुक्ती दिन साजरा करण्याचा अनुभव त्या महिलेनंं सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Written by ट्रेंडिंग न्यूज डेस्क
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-01-2023 at 15:39 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bengaluru woman shasvathi siva posted on linkedin about celebrating her fourth divorce anniversary viral news nss