Bengaluru Road Rage Viral Video : बेंगळुरूमध्ये तीन तरुणांनी एका महिलेच्या कारचा जबरदस्तीने पाठलाग केल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या प्रकरणी कारवाई करीत पोलिसांनी सोमवारी तिघांना अटक केली आहे. स्कूटरवरून जाताना हे तिघेही आक्रमकपणे तरुणीच्या गाडीचा पाठलाग करीत होते, व्हायरल व्हिडीओत तीन तरुण तरुणीच्या कारचा पाठलाग करीत दरवाजा आणि खिडकीला धक्का मारताना दिसत आहेत. इतकेच नाही, तर ते चालत्या कारचा दरवाजा जबरदस्तीने उघडण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे कारमधील महिला चांगलीच घाबरली होती. त्यानंतर सरकारने जारी केलेल्या हेल्पलाइन नंबरवर कॉल करीत तिने घडलेला प्रकार सांगितला. धक्कादायक बाब म्हणजे हा सर्व प्रकार सुरु असताना महिलेच्या मदतीसाठी कोणीही पुढे आले नाहीत. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केलाय.

प्रियम सिंग असे या महिलेचे नाव आहे. व्हिडीओत तुम्ही ऐकू शकता की, ते माझ्या मागे लागले आहेत. ते माझ्या गाडीला धक्का मारत आहेत. स्कूटरवर बसलेले ते तीन अशा प्रकारे त्या तरुणीला घाबरवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. यावेळी ती त्यांच्यापासून सुटका करून घेण्यासाठी आपला मार्ग बदलते; पण ते तरुण तरीही तिचा पाठलाग करीत राहतात. यावेळी ती तरुणी फोनवर बोलताना ऐकू येतेय की, ते मला शिवीगाळ करीत आहेत, माझ्या कारचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही वेळाने ती तिची कार रस्त्याच्या कडेला थांबवते.

Mokka crime fugitive arrested from Karnatak Pune news
Pune Crime News: मोक्काच्या गुन्ह्यातील फरारीला कर्नाटकातून अटक
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
Santosh Deshmukh Murder Case
“…म्हणून माझ्यावर ही वेळ आली का?” मयत सरपंच संतोष देशमुखांच्या आईचा टाहो; पत्नी म्हणाली, “ते १५ वर्षांपासून..”
Satish Wagh murder case, Pune police, Pune ,
सतीश वाघ हत्या प्रकरण : नवनाथ गुरसाळे आणि पवन शर्मा दोन आरोपींना अटक अन्य आरोपींचा शोध सुरू
Satish wagh murder case, Pune police,
सतीश वाघ हत्या प्रकरण : आरोपींच्या शोधासाठी पुणे पोलिसांची १६ पथके रवाना
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Vasai-Virar City Municipal Corporation
प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी

या घटनेचा एक व्हिडीओ महिलेने तिच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करीत म्हटले की, ही घटना सेंट जॉन हॉस्पिटलच्या गेट क्रमांक ५ जवळ घडली. KA04LK2583 नोंदणी क्रमांक असलेल्या स्कूटरवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी माझ्या कारचा (KA51MT5653) पाठलाग केला. होसूर रोड-कोरमंगला उजवे वळण जंक्शन ते नागार्जुन रेस्टॉरंट KHB कॉलनी 5 ब्लॉक कोरमंगलापर्यंत पाठलाग केला. त्याने माझ्या कारच्या खिडक्यांवर बुक्के मारले.

Story img Loader