बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याने सध्या तरुणांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.बेरोजगार झालेल्यांमध्ये प्रामुख्याने पदवीधारकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अर्थव्यवस्था म्हणाव्या तितक्या वेगाने आणि सर्वसमावेशक वाढली नाही, हे बेरोजगारीचे सर्वांत मोठे कारण ठरले आहे.कमी शिकलेले तरुण लहान मोठे काम करणे सुरू करतात. मात्र पदवीधर तरुण आपल्या शिक्षणायोग्य नोकरी पाहतात. मात्र नवीन नोकऱ्याच निर्माण होत नसल्याने तरुण बेरोजगार होत आहेत. खूप महिन्यांपासून नोकरी शोधूनही ती मिळत नसल्याने अनेकांनी नाराज होत आता नोकरी शोधणेच थांबविले आहे.दरम्यान याच बेरोजगारीवर तरुणानं गायलेल्या गाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बेरोजगारीवर तरुणानं गायलं भन्नाट गाणं
बेरोजगारीचं हे गाणं एका व्यक्तीनं अतिशय भन्नाट शैलीत गायलं आहे, ज्याचं भरभरून कौतुकही होत आहे. केवळ सोशल मीडियावरच नाही तर जिथे तो गात होता तिथे मुलांचीही मोठी गर्दी होती. एका जुन्या गाण्याच्या बेसवर त्या माणसाने हे गाणं गायलं आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, गायकाला किती दाद मिळत आहे. मुले त्याला प्रोत्साहन देताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – Video: ‘मेरे बॉयफ्रेंडसे गुलुगुलु करेगी तो धोपटुंगी ना’..रस्त्यावरच भिडल्या शाळकरी मुली
हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून त्याला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत, तर नेटकरी यावर संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत.