अक्षर कसे मोत्याच्या दाण्यासारखे असावे दासबोधातून सुंदर हस्ताक्षर कसे असावे याबद्दल सांगितले आहे. त्यामुळे लहानपणीच अक्षर गिरवताना या सुंदर अक्षराचे बाळकडु दिले जाते. सध्या अशा सुंदर हस्ताक्षराचे एक छायाचित्र सोशल मीडियावर फिरते आहे. सुरुवातीला फाँट वापरून टाईप केल्यासारखे हे अक्षर अनेकांना वाटले. पण हे टाईप केले नसून एका शाळेत शिकणा-या मुलीचे ते हस्ताक्षर आहे. ही मुलगी आठवीत शिकत असून, नेपाळ देशातील सर्वाधिक सुंदर हस्ताक्षराचा मान तिला मिळाला आहे.
प्रकृति मल्ला असे या मुलीचे नाव असून तिचे हस्ताक्षर नेपाळमधील सगळ्यात सुंदर हस्ताक्षर आहे. एखाद्या सुलेखनकारालाही लाजवले इतके सुंदर अक्षर या मुलीचे आहे. नेपाळच्या सैनिकी आदीवासी शाळेत ती शिकते. तिच्या हस्ताक्षराला नेपाळ सरकार आणि सेनेकडून पुरस्कार देखील देण्यात आला. तिच्या हस्ताक्षराचे कौतुक फक्त नेपाळमध्येच होत नाही तर जगभर तिच्या या सुंदर अक्षरावर अनेकजण भाळले आहेत. फेसबुक, ट्विटर, व्हाटअॅपवर तिच्या हस्ताक्षराचे फोटो खूपच व्हायरल झाले आहेत.