Navratri Dandia makeup look tips: नवरात्रीला आजपासून सुरुवात झाली आहे. आजपासून पुढचे नऊ दिवस गरबा आणि दांडीयाचा खेळ रंगणार आहे. नवरात्र हा विषयही सध्या ट्रेडिंगवर आहे.रोज वेगवेगळे विषय हे ट्रेंडिंगवर असतात. एखादा विषय सहज येतो आणि अख्ख्या सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागतो. तर, कधी एखाद्या घटनेमुळे त्याच्या आणखी चार बाजू सोशल मीडियामुळे समोर येतात. याच गूगल ट्रेंडवर नवरात्र हा विषयही ट्रेडिंगवर आहे. नवरात्र म्हटलं की आपल्याला गरबा आठवतो. रात्र – रात्र जागून तासंतास गरबा खेळल्याशिवाय नवरात्र अपूर्णच आहे. नवरात्रीत आपण गरबा खेळलो नाही असे होऊच शकणार नाही. काहीजण तर गरबा खेळण्यासाठीच नवरात्रीची आवर्जून वाट बघत असतात. सण म्हटलं की मग कोणताही सण असो प्रत्येक सणावाराला महिला आपली नटण्या – मुरडण्याची हौस भागवून घेतात. अशातच गुगल ट्रेंडवर असणाऱ्या या नवरात्रीत गरबा-दांडिया खेळायला जाताना आणि एकूणच नवरात्रीत नटताना मेकअप कसा करता येईल हे आज जाणून घेऊया.

दिवसा करायचा मेकअप

eknath khadse devendra fadnavis
उलटा चष्मा : पांढरे निशाण…
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Ragi Upma Recipe
२ वाटी पीठापासून नाश्त्यामध्ये बनवा नाचणीचा पौष्टिक उपमा; वाचा साहित्य आणि कृती
shivali parab mother emotional after seeing the look of Mangla movie
‘मंगला’ चित्रपटातील शिवाली परबचा लूक पाहून आई झालेली भावुक; म्हणाल्या, “१२ तास चेहऱ्यावर मेकअप, जेवायला नाही अन्…”
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Jaggery Makhana recipe
उपवासाच्या दिवशी आवर्जून बनवा गूळ मखाणा; एकदम सोपी रेसिपी
kareena Kapoor
“आतापर्यंतची सर्वात कूल गँगस्टर…”, करीना कपूरच्या शर्मिला टागोरांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा; म्हणाली, “माझ्या सासूबाईंना…”
Nutritious ragi cutlets recipe
फक्त ३० मिनिटांत बनवा नाचणीचे पौष्टिक कटलेट; वाचा साहित्य आणि कृती

१. पाण्यानं किंवा फेस वॉश वापरून चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
२. नॅपकिननं चेहरा व्यवस्थित टिपून प्रथम मॉइश्चरायझर लावा आणि २ मिनिटं व्यवस्थित मसाज करून ते त्वचेमध्ये मुरवून घ्या.
३. यानंतर आपल्या त्वचेच्या रंगानुसार फाउंडेशन हलकेच लावून चेहऱ्यावर नीट ‘ब्लेंड’ करा. फाऊंडेशन फार सफेद वापरू नये, तसं केल्यास मेकअप ‘ग्रे’ दिसू शकतो.
४. फाउंडेशन सुकल्यानंतर ते फिक्स करण्यासाठी हलकेच पावडर लावा. फाउंडेशन ओलं असताना पावडर लावली, तर मेकअप केकी किंवा सफेद दिसतो, त्यामुळे हे टाळावं. कपाळ, नाक, ओठांभोवती आणि हनुवटीवर पावडर व्यवस्थित लावावी, म्हणजे या जागी तेलकट झालं तरी ते लवकर दिसून येणार नाही.
५. डोळ्यांच्या मेकअपसाठी रंग कुठले वापरावे, हे ठरवताना आपण विरुद्ध रंग वापरू शकतो. रंगचक्र पाहिलंत तर विरुद्ध रंग कोणते ते लगेच समजेल. उदा. हिरव्या रंगाचा ड्रेस घालणार असाल तर त्याच्या विरुद्ध- म्हणजे केशरी रंगाचं आय शॅडो करू शकता. फार गडद रंग न वापरता दिवसा सौम्य मेकअप करावा. एखाद्या विशिष्ट रंगाचं आय शॅडो तुमच्याकडे नसेल, तर ब्राऊन रंग कुठल्याही ड्रेसवर उठून दिसतो.
६. आयलायनर, काजळ, मस्कारा लावून आपला आय मेकअप पूर्ण करा.
७. भुवयांसाठी काळी पेन्सिल वापरू नये. ब्राऊन रंग वापरावा, तो अधिक नैसर्गिक दिसतो.
८. ब्लश आवडत असेल तर तेही आपण लावू शकता. पण शक्यतो पीच रंगाचं ब्लशर वापरावं.
९. दिवसा नैसर्गिक रंगाची लिपस्टिक- म्हणजे पीच, गुलाबी, न्यूड रंग इत्यादी वापरावं, म्हणजे मेकअप फार गडद दिसणार नाही.

गरबा-दांडियासाठी ‘ग्लॅमरस आय मेकअप’

१. आधी डोळ्यांवर काळं किंवा ब्राऊन रंगाचं काजळ लावून घ्यावं.
२. ते नीट पसरवून घेण्यासाठी ब्राऊन रंगाचा वापर करून नीट ब्लेंड करावं.
३. काजळ लावलेल्या भागावर आपण आपल्या आवडीनुसार काळा, चॉकलेटी, हिरवा, निळा, जांभळा अशा कोणत्याही रंगांचं आय शॅडो (पावडर स्वरूपातलं) लावून व्यवस्थित ब्लेंड करुन घ्या.
अशा प्रकारे आपला सोपा, लवकर होणारा आणि सुंदर दिसणारा ‘स्मोकी आईज’ मेकअप तयार!

हेही वाचा >> Navratri 2024: नवरात्रीत ९ दिवस उपवास करताय? खा हे पदार्थ, दिवसभर राहाल एनर्जेटिक

ही टिप लक्षात ठेवा –

‘आय मेकअप’ सौम्य केला, तर लिपस्टिक गडद लावता येते आणि आय मेकअप गडद केला तर लिपस्टिक सौम्य ठेवावी, म्हणजे लूक उठून दिसेल.

(सौजन्य – google trend)

हेही वाचा >> Navratri 2024: शैलपुत्री ते सिद्धीदात्री ‘ही’ आहेत देवीची नव रुपं! नवदुर्गाची नऊ रुपे कोणती?

नवरात्रीला आजपासून सुरुवात झाली असून नवरात्र हा किवर्ड ट्रेंडिंगवर आहे. वर दिलेल्या गुगल ट्रेंड्सच्या चार्टमध्ये तुम्ही पाहू शकता, नऊ तासांमध्ये १ हजारांपेक्षा अधिक युजर्सनी नवरात्री हा विषय सर्च केला आहे.

Story img Loader