Polytechnic Admission Tips: आवडत्या कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळावं, अशी अनेक विद्यार्थ्यांची इच्छा असते. पण अशा कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळण्यासाठी आवश्यक असणारी ग्रेड विद्यार्थ्यांकडे असणे खूप आवश्यक असतं. ज्यावेळी त्यांना अशा ग्रेड मिळतात, त्यानंतर अर्ज करताना कोणतीही चुकी होऊ नये, याची काळजी विद्यार्थ्यांना घ्यावी लागते.

जर तुम्ही एका पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये अर्ज करण्याची तयारी करत असाल, तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. चांगल्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये अॅडमिशन घेण्यासाठी चांगल्या अॅकेडमिक ग्रेडची आवश्यकता असते. पण तुम्ही गोंधळून जाऊ नका. पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये अॅडमिशन घेण्यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. या टिप्स फॉलो केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आवडीच्या कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळू शकतं.

schedule for postgraduate medical admissions announced after changing eligibility criteria
पात्रता निकष बदलल्यानंतर वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठीचे वेळापत्रक जाहीर
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
article about upsc exam preparation guidance
यूपीएससीची तयारी : CSAT ची तयारी
Higher education , skill courses, guidelines UGC,
उच्च शिक्षणात आता कौशल्य अभ्यासक्रमांवर भर; ‘यूजीसी’कडून मार्गदर्शक सूचनांचा मसुदा प्रसिद्ध
upsc exam preparation tips,
यूपीएससीची तयारी : सीसॅट पेपर
yavatmal Adv Pranav Vivek Deshmukh graduated from London School of Economics
यवतमाळचा विद्यार्थी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत
yavatmal student success in london school of economics
यवतमाळचा विद्यार्थी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत
assistant professor without NET-SET
सहायक प्राध्यापक होणे नेट-सेटशिवायही शक्य?

वेळेचं नियोजन

जेव्हा तुम्ही एखाद्या परीक्षेची तयारी करता, त्यावेळी वेळेचं नियोजन असणं खूप महत्वाचं असतं. वेळ फुकट जाणार नाही, याची काळजी विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे. वेळेचं खूप चांगल्या पद्धतीने नियोजन करा आणि प्रत्येक विषयासाठी एक प्लॅन करा. जर एखादा विषय कठीण वाटत असेल, तर त्यासाठी जास्त वेळ द्या.

नक्की वाचा – दहावी आणि ITI पास असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, १७९३ पदांची निघाली बंपर भरती

छोट्या छोट्या नोट्स बनवा

जेव्हा तुम्ही अभ्यास करायला सुरुवात कराल,त्यावेळी छोट्या नोट्स तयार करा. याचा फायदा तुम्हाला एखाद्या विषयाचं रिवीजन करताना होईल. तुमचा वेळही वाचेल आणि कमी अभ्यासात जास्त काम होईल.

जेईईसीयुपी

परीक्षेत जास्तीत जास्त प्रश्न ज्या पुस्तकांमधून विचारले जातात, अशाच पुस्तकांचा अभ्यास करा. परीक्षेत ज्या विषयांचे प्रश्न विचारले जात नाहीत, असा पुस्तकातील अभ्यास करु नका.

सिलॅबस आणि परीक्षेची पद्धत समजून घ्या

परीक्षेची तयारी सुरु करण्याआधी सिलॅबस आणि जेईईसीयूपी 2022 एग्जाम पॅटर्नविषयी संपूर्ण माहिती गोळा करा. परीक्षेत येणाऱ्या सर्व विषयांच्या सिलॅबसचं सविस्तर माहिती वाचा. कोणत्याही विषयाकडे किंवा चॅप्टरकडे दुर्लक्ष करु नका. कारण त्यामुळे तुम्हाला परीक्षेत कमी गुण मिळण्याची शक्यता आहे.

Story img Loader