डिसेंबर महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. वर्षाचा शेवटचा महिना आणि न्यू इयर सेलिब्रेशनिमित्त अनेक जण फिरायला जायचा प्लॅन करतात. अशा वेळी डिसेंबर आणि जानेवारीदरम्यान विमान तिकीट बुकिंग महाग असते. तुम्ही शेवटच्या क्षणी जेव्हा तिकीट बुक करण्यासाठी जाता, तेव्हा तुम्हाला तिकिटीसाठी अधिक पैसे मोजावे लागतात. यावेळी सर्वप्रथम तुम्ही आगाऊ तिकिटे बुक करण्याचा प्रयत्न केला पाहिजे; ज्यामुळे तुम्ही तिकिटासाठीचे पैसे वाचवू शकता. आज आम्ही तुम्हाला विमान तिकीट सर्वांत स्वस्तात मिळवण्याच्या सहा सोप्या टिप्स सांगणार आहोत; ज्यामुळे तुम्ही कमी बजेटमध्ये फिरायला जायचा प्लॅन करू शकता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बहुतेक प्रवाशांना हे माहीत आहे की, सकाळच्या वेळेस विमान तिकीट बुक केल्यास ते स्वस्तात मिळण्याची शक्यता असते. त्यानंतर त्याच्या किमती वाढतात. कारण- विमानातील रिकाम्या सीट्स भरण्यासाठी विमान कंपन्यांना दिवसातून अनेक वेळा त्यांच्या विमान भाड्यात बदल करावा लागतो. त्यामुळे बुकिंग करताना काही खास गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते.

वर्किंग डेदरम्यानचे विमान तिकीट बुक करा. तुम्ही समूहाने जात असाल, तर प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र तिकीट खरेदी करा. एअरलाइन्स कंपन्या सहसा वेगवेगळ्या भाड्यात ठरावीक सीट्ससाठी सवलत देत असतात. समजा- सर्वांत कमी दरासह फक्त दोन सीट्स शिल्लक आहेत; पण तुम्हाला चार सीट्स बुक करायच्या असतील, तर तुम्हाला त्या दोन सीट्स यात मिळणार नाहीत. तुम्हाला वेगळ्या चार सीट्स मिळतील.

incognito mode चा करा वापर

दुसरी सर्वांत महत्त्वाची गोष्ट. तिकीट बुक करताना incognito mode चा वापर करा. कारण- मागणीनुसार विमानाच्या किमती सतत बदलत असतात. त्यात अधिक लोक तिकीट सर्च करीत असल्याचे सिस्टीमला आढळल्यास, एअरलाइन्स कंपन्या त्वरित तिकीट दरवाढ करतात. एअरलाइन्स तुमच्याकडून जास्त किंमत आकारण्याचा प्रयत्न करील. कारण- तुम्हाला तिकीट काढायचे आहे हे सिस्टीमला कळलेले असते. त्यासाठी तुम्ही सर्च कुकीजदेखील डिलीट करा. जर तुम्ही वेबसाइटद्वारे बुकिंग करीत असाल, तर प्रमोशन व प्राइस अॅलर्टसाठी साइन अप करा; जेणेकरून जेव्हाही विमान भाड्यावर कोणतीही सूट असेल, तेव्हा तुम्हाला लगेच कळेल. अनेक वेळा अपेक्षेपेक्षा खूपच स्वस्त तिकिटे मिळू शकतात.

वापर करा ट्रॅव्हल क्रेडिट कार्डचा

जर तुम्हाला वारंवार प्रवास करायला आवडत असेल, तर ट्रॅव्हल क्रेडिट कार्डचा वापर करा. आजकाल ते कोणतेही शुल्क न घेता, सहज उपलब्ध आहे. नियमित बुकिंगवर पॉइंट्स मिळतात आणि मोठी बचत होते. साधारणत: आगाऊ बुकिंग करून ठेवावे, असे सांगितले जाते. परंतु, काही वेळा शेवटच्या क्षणीदेखील तुम्हाला विशेष ऑफर मिळण्याची शक्यता असते. काही एअरलाइन्स फ्रिक्वेंट फ्लायर प्रोग्रामदेखील चालवतात. जर तुम्ही नियमित प्रवास करीत असाल, तर त्याचा एक भाग होऊन तुम्ही खूप पैसे वाचवू शकता. तिकीट खरेदी करताना भाड्यात काही छुपे शुल्क आहे की नाही हे नक्की पाहा. जसे सामान शुल्क, सीट प्रेफरन्स व एअर टॅक्स. तिकीट बुकिंग प्रोसेस सबमिट करण्यापूर्वी त्यात भरलेली माहिती बरोबर आहे का ते एकदा नीट तपासून घ्या.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best tips to grab the cheapest flight tickets secret hacks to book cheap flight tickets tips for finding the best deals in plane tickets trick can you get cheapest flight booking sjr