प्रत्येकाच्या आयुष्यात त्यांच्या मुलींसाठी खूप महत्वाचं स्थान असतं. मुलींमुळे घरात सौंदर्य टिकून राहतं. मुली आपल्या आई-वडिलांची खूप काळजी घेतात असं अनेकदा दिसून येतं. सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक मुलगी आपल्या वडिलांसाठी रडताना दिसत आहे. ती तिच्या वडिलांची इतकी काळजी घेते की हा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा भावूक व्हाल. सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप वेगाने व्हायरल झाला आहे. सोशल मीडिया यूजर्स या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगी आपल्या वडिलांसाठी रडत असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये चिमुकलीची आई तिला विचारताना दिसून येतेय की, ती का रडत आहे? काय झालंय, काही चुकलंय का? मी तुला अजून खडसावलेही नाही.” हे ऐकून शाळेच्या ड्रेसमध्ये बसलेली मुलगी तुटलेल्या आवाजात म्हणते, ‘आधी तुम्ही रेकॉर्डिंग बंद करा, मगच मी तुम्हाला सांगेन.’ त्यानंतर आई सुद्धा या चिमुकलीला म्हणते, आधी मला सांग काय झालं तुला? मगच मी रेकॉर्डिंग बंद करेल. त्यानंतर ही चिमुकली तिला काय झालंय हे सांगण्यासाठी तयार होते.

आणखी वाचा : सिनेमातला सीन नव्हे, रिअल लाइफ मर्दानीचा खरा VIDEO VIRAL; ७३ वर्षीय आजीने एकटीने चोराला पडकलं

या दोन मिनिटांच्या व्हिडीओमध्ये चिमुकलीने जे उत्तर दिलं ते ऐकून तुमचे डोळे पाणावतील हे मात्र नक्की. हा व्हिडीओ पाहून प्रत्येकजण या मुलीच्या प्रेमात पडू लागले आहेत. ज्यांना मुली आपल्या जबाबदारीचं ओझं वाटतात त्यांनी एकदा व्हिडीओ बघावा असंही लोक लिहित व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करताना दिसून येत आहेत. आईने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना हा चिमुकली म्हणते, “मला पापाची खूप आठवण येते.” तिच्या डोळ्यातून अश्रु गाळत ही मुलगी म्हणते की, वडील आमच्यासाठी किती धडपड करतात. पापा वेळेवर जेवत सुद्धा नाहीत.”

आणकी वाचा : क्रेनसमोर अचानक एक महाकाय हत्ती आला, मग गजराजाने पुढे काय केलं, पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : अशी कॉपी कोण करतं? विद्यार्थ्याचा जुगाड पाहून शिक्षकही झाले हैराण

पण यावेळी मुलीची आई तिला समजावण्याचा प्रयत्न करते की तिच्या वडिलांना आपल्या ग्राहकांची काळजी घेण्यासाठी कधी कधी जेवण देखील करता येत नाही, ज्यावर मुलगी म्हणते, “मग मम्मी, माणूसाला जेवण करावंच लागतं ना… जसे इतर जणांना जेवण करायचं असतं, तसंच माझ्याही वडिलांना जेवण करायचं असतं ना? मुलीचा हा इमोशनल व्हिडीओ शुक्रवारपासून चांगलाच व्हायरल होत आहे. बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने सुद्धा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. ‘माझे बाबा, किती क्यूट, देव आशीर्वाद दे.’ अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ तिने शेअर केलाय.