The Kashmir Files नुकताच प्रदर्शित झालेला हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटामुळे देशाचं राजकारण ढवळून निघालं आहे. पण सायबर गुन्हेगार देखील याचा गैरफायदा घेताना दिसत आहेत. चित्रपटाच्या नावावर लोकांची आर्थिक फसवणूक होत आहे. त्यामुळे सर्वांनीच सावध राहणं भाग आहे.

नोएडाचे अतिरिक्त उपायुक्त रणविजय सिंह यांनी ‘द काश्मीर फाइल्स’शी संबंधित व्हॉट्सअप स्कॅमबद्दल मोबाईल युजर्सला महत्त्वाची सूचना दिली आहे. या सिनेमाच्या नावाखाली कोणतीही लिंक आली तर ती ओपन करु नका, अशी सूचना त्यांनी दिली आहे. या चित्रपटाच्या नावावर फसवणूक होत आहे. याबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. द काश्मीर फाइल्स पाहण्यासाठी लोकांमध्ये असलेल्या उत्सुकतेचा फायदा घेत सायबर गुन्हेगारांनी व्हॉट्सअपवर चित्रपट मोफत डाउनलोड करण्यासाठी लिंक पाठवली आहे.

minister abdul sattar Attempt to grab industrial plots
शिक्षण संस्थेच्या नावाखाली औद्योगिक भूखंडावर डोळा, मंत्री अब्दुल सत्तार यांच्या खेळीस अधिकाऱ्यांच्या सजगतेमुळे चाप
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
stock market fraud loksatta
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ८७ लाखांची फसवणूक
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
pimpri chinchwad cyber police busted gang operating through China, Nepal crime news
चीन, नेपाळमधून सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
Malvan Shivputla accident case Hearing on bail plea of ​​Jaideep Apte Chetan Patil in High Court Mumbai news
मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरण: जयदीप आपटे, चेतन पाटीलच्या जामीन याचिकेवर उच्च न्यायालयातच सुनावणी
Stock market investment bait, fraud, Pune,
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने २६ लाखांची फसवणूक
Jammu And Kashmir
Jammu And Kashmir : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधातील सैन्याच्या गोळीबारात ट्रेकर्स सापडले; गोळीबार थांबवत सैनिकांनी केली सुटका


एखाद्या व्यक्तीने व्हॉट्सअपवर या लिंकवर क्लिक करताच, फसवणूक करणाऱ्यांना वापरकर्त्याच्या फोनची माहिती मिळते आणि ते सहजपणे त्या व्यक्तीची वैयक्तिक माहिती चोरतात. रणविजय सिंह यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना ही माहिती दिली आहे. फसवणूक करणारे लोक व्हॉट्सअॅपवर लिंक पाठवतात आणि या लिंकसोबत एक मेसेज असतो ज्यामध्ये म्हटले आहे की लोक लिंकवर क्लिक करून काश्मीर फाइल्स चित्रपट विनामूल्य डाउनलोड करू शकतात. कोणताही वापरकर्ता लिंकवर क्लिक करताच, मालवेअर वापरकर्त्याच्या स्मार्टफोनमध्ये जातो.

मालवेअर नंतर वापरकर्त्याचे बँकिंग तपशील चोरण्याचे काम करते. रणविजय सिंह यांनी स्मार्टफोन वापरणाऱ्यांना सल्ला दिला आहे की, व्हॉट्सअपवर अशी कोणतीही लिंक आल्यास त्यावर क्लिक करू नका. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, रणविजय सिंह यांनी सांगितले की, २४ तासांत तिघाजणांनी सायबर फसवणुकीची तक्रार केली आहे. या तिघांची मिळून एकूण ३० लाखांची फसवणूक झाली आहे.