लग्न म्हणजे नवरा आणि नवरी यांच्या आयुष्यातला सर्वात खास दिवस…हा स्पेशल दिवस फक्त त्या दोघांचाच नव्हे तर त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईकांसाठीही आनंदाचा असतो. त्यात नवरी जेव्हा तिच्या ससरी जाते तेव्हा तिथे एक भाऊ आणि मित्र दोन्ही नात्याचं प्रेम देणारी व्यक्ती म्हणजे दीर. या दोघांमधलं नातं इतरांपेक्षा खूप वेगळं असतं. थट्टा मस्करी म्हणजे जणू या नात्यातला गोडवा. अशी थट्ट मस्करी करणाऱ्या एका दीर आणि वहिनी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये दीराने वहिनीसोबत थट्टा करण्याचा प्रयत्न केला खरा…पण यातली वहिनीने शेरास सव्वा शेरप्रमाणे उत्तर दिलं. हे पाहून तुम्ही मात्र हैराण व्हाल. नक्की काय केलंय असं पाहा या व्हिडीओमध्ये…
सोशल मीडियावर दीर आणि वहिनी यांचे वेगवेगळे मजेदार व्हिडीओ व्हायरल होतात. सध्या व्हायरल होत असलेला हा नवा व्हिडीओ बराच चर्चेत आला आहे. लग्नाच्या मंडपात अनेक गमतीजमतीचे किस्से होत असतात. नवरदेव आणि नवरीसोबत मित्रमंडळ अनेक गमतीजमती करत असतात. मात्र लग्नाच्या मंडपात नव्या नवरीसोबत मस्करी करणं दीराला चांगलंच महागात पडलं आहे. भरमंडपात नवरीनं असं काही केलं की दीराने केलेली मस्ती त्याच्या चांगलीच अंगाशी आल्याचं पाहायला मिळालं.
आपण अनेकदा पाहिलं असेल की नवरदेव जेव्हा वरमाला घालण्यापूर्वी स्टेजवर येतो तेव्हा त्याच्यासोबत त्याचा भाऊ आणि मित्रमंडळी स्टेजवर पोहोचतात. अनेकदा जयमालाच्या खुर्चीवर नवरदेवाचे मित्र किंवा भाऊ त्याच्या शेजारी बसतात. मग जेव्हा नवी नवरी जयमाला हातात घेऊन स्टेजवर येते, तेव्हा नवरदेवाचा भाऊ आणि मित्र त्यांच्या वहिनीची मस्करी करण्यासाठी जयमालाच्या खुर्चीवरून उठतच नाहीत. मग त्यावेळी नवी नवरी गोंधळून जाते. नवरदेवाच्या बाजुला बसलेल्या मित्रांना आणि दीराला उठण्यासाठी कसं बोलू, असा प्रश्न नवरीसमोर उभा राहतो. मग यात मोठ्यांच्या हस्तक्षेपामुळे नवरीची कशीबशी सुटका होते. पण सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये असं काहीच घडलेलं नाही. याउटल मजा घेणाऱ्या दीराला वहिनीने चांगलंच उत्तर दिलं. हे पाहून बघणारे केवळ बघतच राहिले.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, स्टेजवर नवरी-नवरदेवाच्या खुर्चीवर नवरदेव निवांत बसलेला दिसून येतोय. त्याच्या शेजारी त्याचा भाऊ मोबाईलमध्ये काहीतरी बघत बसलेला दिसून येतोय. काही वेळाने नव्या नवरीची स्टेजवर एन्ट्री होते. नवरी आलेली असून सुद्धा दीर खुर्चीवरून उठत नसतो. पण याचा नवरीला काहीही फरक पडला नसल्याचं तिच्या चेहऱ्यावरून दिसून आलं. ही नवरी अगदी बिनधास्तपणे त्या दीराच्या शेजारी खेटून बसते. हे पाहून लग्नमंडपातील मंडळी मात्र केवळ बघतच राहीले. तसंच दीराचा चेहरा सुद्धा बघण्यासारखा झाला आहे.
आणखी वाचा : रोनाल्डोच्या भेटीसाठी मैदानात धावत आली चिमुकली फॅन, Cristiano Ronaldo ने दिलं हे खास गिफ्ट, पाहा VIRAL VIDEO
हा व्हिडीओ ‘ट्रेंडिंग वेडिंग कपल्स’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ शेअर करताना सोबत एक जबरदस्त कॅप्शम सुद्धा देण्यात आलीय. ‘वहिनीसोबत पंगा घेऊ नका भाऊजी…’ असं लिहित हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तिला या गमतीजमतीचा काहीच फरक पडला नाही असं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर युझर्सनी कमेंट्स केल्या आहेत. आतापर्यंत या व्हिडीओला १ लाख ७७ हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिलाय. सोबत वहिनीसोबत घेतलेला पंगा पाहून नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स शेअर केल्या आहेत. नेटकऱ्यांनी या व्हिडीओ चांगला आनंद लुटला आहे.