आपल्या आसपास अनेक प्राणी प्रेमी असतात जे कुत्रा- मांजर प्रचंड आवडतात. अनेक लोक कुत्रा-मांजर पाळतात. अनेकांना कुत्रा-मांजर पाळण्यासाठी घरातून परावनगी मिळत नाही पण म्हणून त्यांचे या प्राण्यांवरचे प्रेम कमी होत नाही. अशा व्यक्ती जिथे कुत्रा- मांजर दिसेल तिथे त्यांच्या खेळताना दिसतात. रस्त्यावरील भटके कुत्रे असो की मांजरी हे लोक त्यांच्या जवळ जाऊन त्यांना कुरवाल्याशिवाय राहूच शकत नाही. प्राणी प्रेमी व्यक्तींना कुत्रा-मांजर यांच्यावर भरभरून प्रेम करतात. सध्या अशाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. गेट बाहेर उभे राहून कुत्र्यांच्या पिल्लांबरोबर खेळणारा चिमुकला चक्का भांगडा नृत्य करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा – एम.एस. धोनी आणि ऋषभ पंत यांच्यात रंगला सामना; सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओमध्ये __vamsi_edits वर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये एक दोन कुत्र्याचे पिल्लू गेटच्या आत आहेत आणि गेटच्या बाहेर एक चिमुकला उभा राहून त्यांच्याशी खेळत आहे. अचानक तो भांगडा नृत्य करू लागतो. ते पाहून कुत्र्याची पिल्लूही उत्साहत उड्या मारताना दिसत आहे. गेट बाहेर उभ्या असलेल्या आपल्या मित्राला भेटण्यासाठी ते प्रयत्न करत आहे. चिमुकला मात्र त्यांचे लाडाने कुरवाळून, डान्स करून आपला आनंद व्यक्त करताना दिसत आहे. लोकांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा – पाण्याशिवाय अंडी कशी उकडवावी? गावाकडे वापरली जाणारी हटके पद्धत एकदा पाहाच, व्हिडीओ होतोय व्हायरल

एकाने लिहिले की, “कृपया तो गेट उघडा.” दुसऱ्याने लिहिले की, अरे किती सहज तो डान्स करत आहे. मला असा सहज डान्स करायचा आहे. भांगड हा खूप उत्साही डान्सचा प्रकार आहे. तिसऱ्याने लिहिले, किती गोंडस आहे हा व्हिडीओ.” चौथ्याने लिहिले, “काहीही म्हणता डान्स खूप चांगला केला” पाचव्याने लिहिले की, “खूप छान आणि गोंडस व्हिडीओ आहे. मुलं खूप निरागस असतात . किती शूर आहे तो. त्या प्राण्याला आनंदी करण्यासाठी त्यांच्याबरोबर डान्स करत आहे”