Bharat Bandh patana video: एससी-एसटी आरक्षणात सब कॅटेगिरी ठेवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर दलित आणि आदिवासी समाजातून प्रचंड रोष व्यक्त होत आहे. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आज ‘भारत बंद’ची हाक देण्यात आली आहे. या बंदचा देशभर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम झाला आहे. बिहार, झारखंड व राजस्थान यांसारख्या देशातील महत्त्वाच्या राज्यांत जाळपोळ करण्यात येत आहे. आंदोलकांनी रेल्वे रुळांचा ताबा घेऊन ‘रेल्वे रोको’ केला आहे. काही ठिकाणी ‘रास्ता रोको’ही होत आहे. दरम्यान, या आंदोलनावेळी पोलिसांकडून चक्क उप-जिल्हाधिकाऱ्यांवरच लाठीचार्ज करण्यात आला. त्यावेळी उपजिल्हाधिकारीही संबंधित पोलिसावर खूप संतापल्याचे दिसून आले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, नेटिझन्स पोलिसांना ट्रोल करीत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांचा चक्क डेप्युटी कलेक्टरवरच लाठीचार्ज

अनुसूचित जाती-जमाती आरक्षणात क्रीमिलेयर आणि कोटा लागू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दलित-आदिवासी संघटनांनी बुधवारी म्हणजेच २१ ऑगस्ट रोजी १४ तासांसाठी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ दलित अॅण्ड ट्रायबल ऑर्गनायझेशन नावाच्या संघटनेने सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आलेला निर्णय दलित आणि आदिवासींच्या घटनात्मक हक्कांच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करण्यात यावा, अशी मागणी संघटनेने केंद्र सरकारकडे केली आहे. दरम्यान, या ‘भारत बंद’मध्ये सहभागी होत काही संघटनांनी केलेल्या आंदोलनास बिहारमधील पाटणा येथे हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले. पाटणामध्ये पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. त्यावेळी उप-जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस व इतर पोलिस दलेही रस्त्यावर उतरली होती. मात्र, यावेळी पोलीस दलामधील एका पोलिसाने चक्क उपजिल्हाधिकाऱ्यावरच लाठीचार्ज केल्याची विस्मयकारी घटना घडली.

साहेब संतापले अन् पुढं काय झालं

बदलापूर शाळेतील चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेवरून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू असून, २४ ऑगस्ट रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाकही देण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून ही हाक देण्यात आली आहे. बदलापुरातील घटनेच्या निषेधार्थ आणि राज्यातील महिला भगिनींच्या सुरक्षिततेचा मुद्दा घेऊन विरोधी पक्ष आक्रमक बनले आहेत. दुसरीकडे आज ‘भारत बंद’ची हाक देण्यात आली होती. त्यासही संमिश्र प्रतिसाद मिळाला असून, बिहारमधील काही ठिकाणी पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला.

यावेळी उप-जिल्हाधिकारी संतापून पोलिसांवर ओरडताना दिसत आहेत. यावेळी इतर पोलीसही त्या पोलिसांना त्यांची चूक लक्षात आणून देतात. त्यानंतर ते पोलीस स्वत:ही उप-जिल्हाधिकाऱ्यांची माफी मागताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “पैशासाठी नाहीरे…” या आजोबांच्या कष्टामागचं कारण ऐकून तुमचाही जगण्याचा दृष्टीकोन बदलेल; वाचा नक्की काय घडलं?

काय बोलावं आता!

या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकाने कमेंट केलीय, “अवघड आहे; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं तंतोतंत पालन झालंय.” आणखी एकाने कमेंट केली आहे, “काय बोलावं आता; काहीही होऊ शकते.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bharat bandh video shows cop mistakenly hitting sdm with baton during lathicharge in patna video goes viral srk