Viral Video: सोशल मीडियावर कधी कुठलं गाणं व्हायरल होईल हे सांगता येत नाही. जेव्हापासून रील्स बनवण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे तेव्हापासून सतत विविध भाषांतील, विविध देशांतील नवनवीन गाणी व्हायरल होतात; ज्यावर लाखो लोक रील्स बनवतात. इतकेच नव्हे, तर ही गाणी अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही लावली जातात. वर्षभरापूर्वी प्रदर्शित झालेल्या गुलाबी साडी या मराठमोळ्या गाण्यानेही सोशल मीडियावर अनेकांना वेड लावले आहे. या गाण्यावर लाखो लोक रील्स बनवून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. फक्त सामान्य लोकच नाही, तर अनेक दिग्गज मराठी, बॉलीवूड कलाकार, तसेच परदेशांतील अनेक प्रसिद्ध कलाकारांनीही या गाण्यावर रील्स तयार केल्या आहेत. अशातच आता या गाण्यावर डान्सचा नवा व्हिडीओ समोर आला आहे; जो पाहून प्रत्येक जण या डान्सचे कौतुक करताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजपर्यंत तुम्ही ‘गुबाली साडी’ या गाण्यावर विविध वयोगटांतील अनेक व्हिडीओ पाहिले असतील. पण, आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये काही तरुणी या गाण्यावर भरतनाट्यम स्टाईलमध्ये डान्स करताना दिसत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तीन तरुणींनी भरतनाट्यम नृत्य करताना घातला जाणारा पोशाख परिधान केला. यावेळी त्या ‘गुलाबी साडी’ गाण्यावर भरतनाट्यम स्टाईलमध्ये डान्स आहेत. सध्या त्यांचा हा डान्स खूप व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

या व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @indianartgallery या अकाउंवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत दोन लाखांहून अधिक व्ह्युज मिळाल्या आहेत. तसेच सात हजारांहून अधिक लाइक्स या व्हिडीओला मिळाल्या आहेत. तसेच त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “खूप सुंदर डान्स.” तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “मस्त डान्स करीत आहेत.” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “खरंच खूप सुंदर.” आणखी अनेक जण या व्हिडीओवर कमेंट्स करून कौतुक करताना दिसत आहेत.