Bhastrika Pranayama VIDEO : दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येक जण निरोगी आरोग्य जपण्याचा प्रयत्न करत असतो. नोकरी, व्यवसाय, घरकाम करताना स्वत:ला उत्साही आणि फ्रेश ठेवणे तितकेच गरजेचे असते. अनेकदा आपण फ्रेश वाटण्यासाठी चहा किंवा कॉफी पितो. पण कॉफी आणि चहा पिणे आरोग्यासाठी तितके चांगले नाही. तुम्ही त्याऐवजी योगासन करू शकता. योग अभ्यासक मृणालिनी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी स्वत:ला कायम उत्साही ठेवण्यासाठी भस्त्रिका प्राणायाम करण्यास सांगितले. व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की त्यांनी भस्त्रिका प्राणायाम करून दाखवले आहे.

भस्त्रिका प्राणायाम

या व्हिडीओमध्ये तुम्हाला योग अभ्यासक मृणालिनी भस्त्रिका प्राणायाम करताना दिसेल. भस्त्रिका प्राणायामसाठी पद्मासनमध्ये बसा. त्यानंतर हाताची मुठ बंद करून खांद्याजवळ ठेवा.एकाच स्ट्रोकमध्ये श्वास घेत हात सरळ वर करा आणि आपल्या मुठी उघडा. एकाच स्ट्रोकमध्ये श्वास सोडत हाताची मुठ बंद करून परत खांद्याजवळ आणा. श्वास घेताना व सोडताना किंचित जलद व स्ट्रोक मध्ये असावा याकडे लक्ष द्या.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
Trending Video girls group dance on marathi song hriday vasant phultana video goes viral
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “हृदयी वसंत फुलताना..” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींच्या डान्सने सर्वांनाच लावलं वेड
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
Ragi Upma Recipe
२ वाटी पीठापासून नाश्त्यामध्ये बनवा नाचणीचा पौष्टिक उपमा; वाचा साहित्य आणि कृती
Savlyachi Janu Savli
Video: “आई मला वाचव…”, सारंगचा जीव संकटात? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत पुढे काय होणार? वाचा…

भस्त्रिका प्राणायाम कसे करावे, हे नीट समजून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पाहा.

हेही वाचा : Papaya Benefits : सकाळी उपाशी पोटी खा पपई , ॲसिडिटीचा त्रास होईल दूर; जाणून घ्या, आहारतज्ज्ञ काय सांगतात..

yogamarathi_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून योग अभ्यासक मृणालिनी यांनी हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “भस्त्रिका प्राणायाम चे व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे २० स्ट्रोक करा त्यानंतर काही सामान्य श्वास घेऊन अजून २ राऊंड करा. (२०X३) भस्त्रिका प्राणायाम उष्मा उत्पन्न करून आपल्या शरीरात उर्जा भरते. यामुळे आपले शरीर व मन उत्साही होऊन सतर्क बनते. तसेच या प्राणायामाच्या नियमित सरावाने –

  1. सायनस, ब्राँकायटिस, फ्लू, सर्दी आणि इतर श्वसन समस्यांमध्ये फायदेशीर ठरते.
  2. फुफ्फुसाची क्षमता वाढवते.
  3. शरीरातील ऑक्सिजन वाढवते.
  4. शरीर आणि मनाला ऊर्जा देण्यासाठी उत्तम ठरते
  5. मज्जासंस्थेला ऑक्सिजन मिळून तुमची संज्ञानात्मक कौशल्ये, फोकस, स्मृती आणि एकाग्रता सुधारते.
  6. ताणतणाव व चिंता कमी होऊन मन शांत होण्यास मदत होते
  7. संपूर्ण शरीरात रक्त प्रवाह आणि परिसंचरण सुधारते.
  8. त्रिदोष संतुलित करण्यास मदत होते.
  9. जलद श्वासोच्छवासामुळे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते ज्यामुळे ऊर्जा पातळी वाढते आणि एकूण आरोग्य सुधारते.
  10. भस्त्रिका प्राणायामामुळे पचनसंस्थेला फायदा होतो,चयापचय सुधारते; पोट फुगणे आणि बद्धकोष्ठता यासारख्या पोटाच्या समस्या कमी होण्यास मदत होते.”

पुढे त्या कॅप्शनमध्ये लिहितात, “गरोदर महिला, मासिक पाळीच्या काळात, उच्च रक्तदाब, पॅनिक डिसऑर्डरचा त्रास असल्यास हे प्राणायाम करणे टाळावे.”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान व्हिडीओ, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल” तर एका युजरने लिहिलेय, “योगा ठिक आहे पण चहा, कॉफी खरंच बंद करावी का?”

Story img Loader