Bhaubheej 2024 Wishes SMS Meassages : दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण असतो. पाच दिवसांचा हा सण देशभरात उत्साहाने साजरा केला जातो. प्रत्येक दिवसांचे एक आगळे वेगळे महत्त्व असते. दिवाळीचा पाचवा दिवस म्हणजेच कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीया तिथीला भाऊबीज सण साजरा केला जातो. हा दिवस बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतिक असतो. या दिवशी बहीण भावाला टिळा लावून, त्याचे औक्षण करून, त्याला दीर्घायुष्य मिळावे यासाठी प्रार्थना करते. या दिवशी बहीण-भाऊ एकमेकांना भेटवस्तू देत शुभेच्छा देतात. आज आपण भाऊबीजेच्या काही हटके शुभेच्छा संदेश जाणून घेणार आहोत.

Bhaubheej 2025 wishes Quotes SMS in Marathi

भाऊबीजेच्या सणाचा उत्साह
असाच कायम राहावा
प्रत्येक बहिणीच्या पाठीशी
एकतरी डोंगरासारखा खंबीर भाऊ असावा
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा !

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा सण,
लाख लाख शुभेच्छा तुला आज आहे
बहीण भावाचा पवित्र सण…
भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा!

हेही वाचा : दिवाळीनिमित्त मित्र-परिवाराला द्या जेठालाल स्टाईल हटके शुभेच्छा; हॅप्पी दिवाळी गाण्याचा VIDEO पाहून पोट धरुन हसाल

रक्षणाचे वचन,
प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा सण,
लाख लाख शुभेच्छा भावा तुला
आज आहे भाऊबीजेचा पवित्र सण

सण बहीण भावाचा आनंदाचा उत्साहाचा
निखळ मैत्रीचा.. अतूट विश्वासाचा
भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा

Bhaubheej 2025 wishes Quotes SMS in Marathi

तू पाठीशी असताना आभाळदेखील ठेंगणं वाटतं,
तुझ्या केवळ असण्याने मला आनंदाचं भरतं येतं.
दादा तुला भाऊबीजेच्या आभाळभर शुभेच्छा!!

पहिला दिवा आज लागला दारी
सुखाची किरणे येई घरी
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!!

हेही वाचा : PHOTO: पगारातला एक शून्य कमी झाला अन् तरुणीनं थेट लग्नच मोडलं; तरुणानं रागात पर्सनल चॅट केले व्हायरल, तुम्हीच सांगा खरी चूक कोणाची?

जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे!
भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे!
भाऊबीज निमित्त सर्वांना मनस्वी शुभेच्छा!

बहिणीची असते भावावर अतूट माया,
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ,
मदतीला देतो नेहमीच हात…
ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

Bhaubheej 2025 wishes Quotes SMS in Marathi

तुझे सारे उन्हाळे, हिवाळे, पावसाळे
मी सोबत हात कायमचा
तुझा धरणार आहे..
मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे…
भाऊबीजेच्या शुभेच्छा

कुठल्याच नात्यात नसेल
एवढी ओढ आहे,
म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं,
खूप खूप गोड आहे…
भाऊबीजेच्या शुभेच्छा

पाण्याच्या ग्लासावरून भांडणाऱ्या
पिझ्झाच्या शेवटच्या घासावरून चिडवणारा
आणि तरीही पैसे साठवून
राखी, दिवाळीला एकमेकांना गिफ्ट आणणाऱ्या
प्रत्येक गोड भावंडाला भाऊबीजेच्या शुभेच्छा!

दिवाळीचे हे दिवे लखलखते
उजळून टाकू हे बंध प्रेमाचे
चिरंतर राहो आपले नाते बहीण भावाचे
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा