घरी लवकर ये आम्ही तुझी वाट पाहात आहोत तुला कोणी काही बोलणार नाही वगैरे प्रकारच्या टिपीकल क्लासिफाइड जाहिरातींबद्दल तुम्ही या पुर्वीही ऐकले असेल. मात्र दिल्लीतील एका व्य़क्तीने दिलेल्या जाहिरातीमुळे ती व्यक्ती चांगलीच चर्चेत आली आहे. मी नवीन गाडी घेतली आहे माझे अभिनंदन करा अशा आशयाची ही जाहिरात सोशल नेटवर्किंगवर चांगलीच व्हायरल झालीय. विशेष म्हणजे दिलेल्या नंबरवर लोकंही त्या व्यक्तीचे अभिनंदन करत आहेत.

ऋशिका या मुलीने ट्विटवर या जाहिरातीचा फोटो आणि तिने या व्यक्तीला कशाप्रकारे शुभेच्छा दिल्या याचा स्क्रीनशॉर्ट शेअर केला. पेपरमध्ये छापून आलेल्या जाहिरातीमध्ये ‘मेरा नाम भवानी शंकर है, मैंने वैगनआर कार खरीदी है, कृपया मुझे बधाई दे’ असा मजकूर आहे. त्याबरोबर गाडीचा नंबर आणि फोन नंबरही देण्यात आलेला आहे. २७ हजारहून अधिक फॉलोअर्स असणाऱ्या ऋशिकाने ट्विट केलेला हा फोटो लगेच व्हायरल झाला आणि लोकं भवानी यांना अभिनंदन करुन त्या व्हॉट्सअप चॅटचे स्क्रीन शॉर्टस ट्विट करू लागले.

अनेकांनी एखाद्याला आनंदी करण्यासाठी इतकं करा म्हणत जाहिरात शेअर करून आपण दिलेल्या शुभेच्छांचे स्क्रीनशॉर्ट शेअर केले आहेत. काहींनी तर थेट भवानी यांना ग्रुपमध्ये अॅड करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावरून पुन्हा एकदा हेच सिद्ध झालेय की नेटकरी खरोखरच कोणता विषय कोणत्या कारणासाठी उचलून धरतील सांगता येणे कठीणच आहे. पाहा त्यातलेच काही ट्विटस

 

Story img Loader