भारतातील इलेक्ट्रिक स्कुटीच्या निर्माती क्षेत्रातील आघाडीची कंपनी ओला इलेक्ट्रिकने आपल्या कंपनीत एका नव्या कर्मचाऱ्याचे अधिकृतपणे स्वागत केले आहे.आश्चर्याची गोष्ट म्हणजे कंपनीचे संस्थापक आणि सीईओ भाविश अग्रवाल यांनी स्वत: त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून या नव्या कर्मचाऱ्याचे स्वागत करत त्याची सविस्तर ओळख करून दिली आहे. भाविश अग्रवाल यांनी या नव्या कर्मचाऱ्याचे कंपनी आयकार्ड शेअर केले आहे. या आयकार्डचा फोटो आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जो पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

नव्या कर्मचाऱ्याच्या आयकार्डचा फोटो पोस्ट करत भावेश अग्रवाल यांनी लिहिले की, एक नवा कर्मचारी कंपनीत अधिकृतपणे रुजू झाला आहे. हे कार्ड पाहून अनेकांना हसू आवरणे कठीण झाले आहे, कारण कंपनीचा हा नवीन कर्मचारी दुसरा तिसरा कोणी नाही, तर प्रत्यक्षात एक कुत्रा आहे. भाविश अग्रवाल यांनी ‘बिजली’ नावाच्या कुत्र्याचे कंपनीत नवा कर्मचारी म्हणून स्वागत केले आहे. भाविश यांची ही पोस्ट आता सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. या पोस्टवर लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया येत आहेत. कुत्र्याला कर्मचारी बनवल्याबद्दल या पोस्टवर दिलेल्या प्रतिक्रियेपेक्षा कितीतरी पट अधिक प्रतिक्रिया ओला इलेक्ट्रिकच्या निकृष्ट सेवेवर टीकेच्या आहेत.

Vloggers Surprise Blinkit Swiggy Delivery Riders With Gifts
एक ही दिल है, कितनी बार जीतोगे! ‘त्यांनी’ डिलिव्हरी बॉयला दिले हटके गिफ्ट; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
car is going viral on social media because of the quotes written on its front funny Photo goes viral
PHOTO: दोस्तांचा नादच नाय! मित्र पोलीस म्हणून कारवर लिहलं असं काही की पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
Marketing idea smart vegetable seller shows funny poster for ladies goes viral on social Media
PHOTO: “महिलांना फेसबूक, व्हॉट्सअॅपसाठी…” भाजी विक्रेत्यानं खास महिलांसाठी लावली अशी पाटी की वाचून पोट धरुन हसाल
Success Story Of IPS officer Nitin Bagate
Success Story: प्रयत्नांती परमेश्वर! एकेकाळी SP कार्यालयाबाहेरील भाजीविक्रेता आज तेथेच डीएसपी पदावर कार्यरत; वाचा, ‘या’ आयपीएस अधिकाऱ्याची गोष्ट…
बारामतीत कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून नाराजी नाट्य; खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Image Of L& T Chairman
रविवारीही काम करण्याचा सल्ला देणाऱ्या L&T च्या अध्यक्षांना कर्मचाऱ्यांपेक्षा ५०० पट अधिक वेतन, २०२३-२४ साठी मिळाले ५१ कोटी रुपये
Shocking accident video five people crushed by young man learning to drive two in critical condition the incident was caught on cctv
बापरे! कार चालवायला शिकणाऱ्या तरुणाने पाच जणांना चिरडले; VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?

बिजलीचा अनोखा कर्मचारी कोड

ओला इलेक्ट्रिकच्या या नवीन कर्मचाऱ्याच्या बिजली नावाचे इंग्रजी भाषांतर इलेक्ट्रिक असे आहे. कंपनीने बिजलीला एक कर्मचारी कोडदेखील दिला आहे, जो तिच्या नावाप्रमाणेच भन्नाट आहे. बिजलीसाठी कर्मचारी कोड 440V असा आहे, जो विद्युत प्रणालींमध्ये मानक व्होल्टेज दर्शविण्यासाठी वापरला जातो. आयकार्डमधील आणखी एक अनोखी गोष्ट म्हणजे रक्तगट. बिजलीचा रक्तगट paw+ve लिहिलेला आहे, ज्याचा अर्थ पॉझिटिव्ह असा आहे.

बिजलीला स्लॅक मेसेजिंग ॲड्रेसही देण्यात आला आहे.

बिजली कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ओला इलेक्ट्रिकने आपल्या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म ‘स्लॅक’वर एक पत्तादेखील तयार केला आहे. यासोबतच कंपनीने बिजलीचा इमर्जन्सी कॉन्टेक्टदेखील लिस्टेड केला आहे. या इमर्जन्सी कॉन्टेक्टमध्ये BA’s Office असे लिहिले आहे. ओलामधील BAचा अर्थ भाविश अग्रवाल असा काढला जातो.

कोरमंगला वर्कप्लेसमध्ये करणार काम

बिजलीच्या आयकार्डनुसार, ओला इलेक्ट्रिकचे ऑफिस होसूर रोड, बंगळुरू येथे आहे; जेथे कोरमंगला वर्कप्लेसमध्ये बिजलीला तैनात करण्यात आले आहे.

सोशल मीडियावर होत आहे कौतुक

भाविश अग्रवालची ही पोस्ट ट्विटरवर चांगलीच व्हायरल झाली आहे. जी आत्तापर्यंत १.४३ लाखांहून अधिक लोकांनी पाहिली आहे. एका युजरने लिहिले की, बिजली नेल्ड इट. दुसर्‍या युजरने लिहिले की, हे नाव आवडले आहे जसे की, बोल्ट. तिसर्‍या यूजरने लिहिले की, हे बिजलीचे जग आहे, आपण सगळे त्यात राहत आहोत.

भाविश यांच्या पोस्टवर ओला इलेक्ट्रिकच्या खराब सेवेबद्दल आणि त्यांच्या स्कुटीमधील कमतरतांबद्दल युजर्सनी शिव्या देणार्‍या पोस्ट अधिक आहेत. या सर्व पोस्टवर ओला इलेक्ट्रिकने माफी मागितली आहे.

Story img Loader