Accident Viral Video: रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही अपघात हे वाहनचालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात; तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, जो पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे. अनेकदा आपण कितीही व्यवस्थित गाडी चालविण्याचा प्रयत्न केला, तरी समोर कोणी चुकीच्या पद्धतीनं गाडी चालवत असेल, तर अपघात हे होतातच. अशा वेळी समोरच्या व्यक्तीच्या चुकीची शिक्षा इतरांनाही भोगावी लागते. सध्या समोर आलेल्या प्रकरणातही असंच काहीसं घडलं आहे. भिवंडीमध्ये एका कारचालकाचं कारवरचं नियंत्रण सुटलं अन् काय घडलं पाहा. आता तुम्हीच सांगा यामध्ये चूक नेमकी कुणाची?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, भिवंडी येथील राजीव गांधी पुलावर हा भीषण अपघात झाला आहे. पुलावर गाड्यांची वाहतूक सुरु आहे, दोन्ही बाजूंनी वेगात गाड्या ये जा करत आहेत. अशातच, एका कार चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटतं आणि हा कारचालक समोरुन येणाऱ्या कारला जोरदार धडक देतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही संताप येईल. चुकीच्या पद्धतीनं गाडी चालवून इतरांची सुरक्षा धोक्यात घातल्यामुळे नेटकरीही संतापले आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “या दोन गोष्टीमुळे जग तुम्हाला ओळखते…” पुणेरी पाटीची सर्वत्र चर्चा; वाचून तुम्हालाही कळेल आयुष्याचा अर्थ

सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडीओ शेअर केले जातात, ज्यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे, तुम्ही सदैव सावध राहा. officialcitypulse नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हि़डीओ पोस्ट करण्यात आला आहे. प्रत्येक वेळी नशीब एवढं बलवत्तर असेलच, असं नाही. रस्ते अपघात आयुष्यात प्रत्येकाला सावरण्याची संधी देत नाही. हा व्हिडीओ लोक वारंवार पाहत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं कमेंट केली आहे की, चारही बाजूला लक्ष दिलं पाहिजे. तर दुसऱ्या युजरने कमेंटमध्ये केलीय की, “यामध्ये यांच्या चुकांमुळे इतर लोकांचे निष्पाप बळी जातात”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhiwandi live accident at rajiv gandhi flyover shocking video goes viral on social media srk