Shocking video: मागील पाच वर्षात देशातील गुन्हेगारी वाढल्याचं चित्र आहे. गावगुंड, चौकातील गुंडांनी कहर केल्याचं दिसतंय. कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असताना नवीन आणि धक्कादायक प्रकार समोर येत आहे. तरुणांची दादागिरी काही संपायचं नाव घेत नाही आहे. अशातच आता एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. यामध्ये जुन्या वैमनस्यातून एका १६ वर्षीय मुलाला विवस्त्र करून क्रूरपणे मारहाण करण्यात आली आहे. आरोपींनी त्याच्यावर हल्ला केला तेव्हा त्याने त्याचा व्हिडिओही शूट केला असून आता तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
हनुमानगंजचे एसीपी राकेश बघेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये काही पुरुष शारदा नगर येथील रहिवासी असलेल्या १६ वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या तरुणाला क्रूरपणे नग्न करत बेदम मारहाण करतण्यात आली आहे. तो मदतीसाठी विनवण्या करत आहे, मात्र त्याच्यावर कुणीही दया दाखवली नाही. त्याला इतक्या अमानुषपणे मारण्यात आलं की त्याचं शरीर काळनिळ पडलं.
ही घटना २२ मार्च रोजी घडली जेव्हा त्याच्या मित्रांनी त्याला चेतक पुलाजवळील एका कॅफेमध्ये बोलावले. तेथून, अरबाज, शानू आणि अल्ताफ आणि इतर पाच जणांनी त्याला हथाई खेडा धरणाजवळ जबरदस्तीने नेले जिथे त्याचे कपडे काढून बेल्ट आणि बुटांनी मारहाण केली. शुक्रवारी अरबाज शेख आणि शानू कोकता यांच्यासह आठ आरोपींविरुद्ध शून्य एफआयआर दाखल करण्यात आला आणि प्रकरण एमपी नगर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आले.यातील काही आरोपींना यापूर्वी वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये तुरुंगात पाठवण्यात आले होते. हा हल्ला जुन्या वैमनस्यातून झाल्याचे सांगितले जात आहे. काही काळापूर्वी काही लोकांनी शानू कोक्ताला तुरुंगाबाहेर मारहाण केली होती. त्या घटनेचा बदला घेण्याच्या उद्देशाने या अल्पवयीन तरुणावर हा हल्ला करण्यात आला.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त करत तरुणाला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. हाच व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.