रस्त्यांवर कोणतेही वाहन चालवताना धोकादायक स्टंट करून नको ते धाडस करण्याचा ट्रेंड तरुणाईमध्ये वाढला आहे. परंतु त्याचे गंभीर परिणाम अनेकदा इतरांना भोगावे लागतात. भोपाळच्या व्हीआयपी रोडवरील एका व्हायरल व्हिडिओमध्ये एक मद्यधुंद तरुणी आणि दोन तरुणांसह भरधाव वेगाने धावणाऱ्या दुचाकीवर उभी राहून धोकादायक स्टंट करताना दिसली. या घटनेचा व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोन पुरूषांना अटक करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडीओमध्ये पाहू शकता की एक दुचाकी भरधाव वेगाने रसत्यावरून धावत आहे. दुचाकीवर दोन तरुण आहे आणि त्यांच्यामध्ये एक तरुणी उभी आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेली ही तरुणी स्टंटबाजी करताना दिसत आहे. मागे बसलेल्या तरुणाने तरुणीला पकडले आहे. तरुणी मद्यधुंद अवस्थेतच व्हिडिओ शूट करणाऱ्यांना अश्लील हातवारे करते. हा सर्व प्रकार व्हिडीओमध्ये कैद झाला असून व्हिडओ व्हायरल झाला आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मनीष लालवाणी यांनी कोह-ए-फिजा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. दोन पुरूष बेपर्वाईने बाईक चालवत होते. तसेच त्या दोन पुरूषांच्यामध्ये दुचाकीवर एक महिला उभी राहून “अश्लील हावभाव” करत होती, ज्यामुळे इतरांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. २८ फेब्रुवारी रोजी घडलेल्या या घटनेने पोलिसांचे लक्ष वेधून घेतले.

कोह-ए-फिजा स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएचओ) विजेंद्र मार्स्कोले यांनी पुष्टी केली की,”हा व्हिडिओ त्याच दिवशी ऑनलाइन समोर आला. घटनास्थळी उपस्थितांनी त्यांच्या फोनवर हे कृत्य टिपण्याचा प्रयत्न केला तेव्हा, तिघांनी त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचे समोर आले आहे. ही क्लिप वेगाने व्हायरल झाली ज्यामुळे डीसीपी (झोन-०३) रियाझ इक्बाल यांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

पोलिसांनी कारवाई सुरू केली आणि ऐशबाग येथील रहिवासी रितिक यादवंशी (२४) आणि सुमित कुमार (२५) यांना अटक केली. पण या महिलेला अद्याप ताब्यात घेण्यात आलेले नाही. स्टंटमध्ये वापरलेली बाईक जप्त करण्यात आली आहे आणि अधिकाऱ्यांनी आरोपी चालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याची शिफारस करणारे पत्र वाहतूक विभागाला लिहिले आहे.

दरम्यान, सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या व्हिडिओवर तीव्र प्रतिक्रिया दिल्या, एका व्यक्तीने कमेंट केली, “हे लोक स्वतः मरतील आणि इतरांना मारतील.” दुसऱ्याने लिहिले, “यांच्या घरातील लोक काहीच बोलत नाही का यांना?”

अटकेनंर, पोलिसांनी कडक इशारा दिला, स्पष्ट केले की सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर स्टंट करणाऱ्यांना गंभीर कायदेशीर परिणामांना सामोरे जावे लागेल. अधिकाऱ्यांनी यावर भर दिला की, विशेषतः व्हीआयपी रोडसारख्या जास्त रहदारीच्या ठिकाणी, असे वर्तन केवळ स्टंट करणाऱ्यांनाच नाही तर त्यांच्या सभोवतालच्या सर्वांना धोक्यात आणते.