Budget 2024 Working Class Announcements: आज, १ फेब्रुवारी २०२४ रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहेत त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आधी फेब्रुवारीत अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. अंतिम अर्थसंकल्प तयार करण्यासाठी आवश्यक वेळ नसल्यास सरकार अंतरिम अर्थसंकल्प सादर करते. बहुतेक वेळा जेव्हा सार्वत्रिक निवडणुका जवळ असतात, तेव्हा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जातो. यंदाचा म्हणजे २०२४-२५ साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प जुलै २०२४ च्या पहिल्या आठवड्यात सादर केला जाणार आहे. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अनेक पोस्ट्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यापैकी एक कर्मचारी वर्गाचा आनंद तिप्पटीने वाढवणारी पोस्ट आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय होत आहे व्हायरल?

व्हायरल पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे, “केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे संवर्धन करण्यासाठी लगेचच नियम बदलणार आहे. १ जुलै पासून कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास १० ते १२ तास करता येणार आहेत, ज्यानुसार आठवड्यात प्रत्येकी चार दिवस १० ते १२ तास काम करून तीन दिवसांची सुट्टी घेता येणार आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडंट फंड्स मध्ये वाढ करून मूळ हातात येणाऱ्या पगाराची संख्या काही प्रमाणात कमी होऊ शकते.”

दरम्यान या व्हायरल पोस्टवर पीआयबीकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. सदर व्हायरल पोस्ट ही पूर्णपणे खोटी असून अशा प्रकारची कोणतीही घोषणा अर्थमंत्री सीतारमण यांनी केलेली नाही.

दुसरीकडे , निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना म्हटले की, “आम्ही गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी अशा चार घटकांवर आम्ही विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्या गरजा, महत्त्वाकांक्षा आणि विकास या गोष्टी आमच्या प्राधान्याक्रमावर आहेत. देशाचा विकास त्यांच्या विकासात दडलेला आहे. आम्ही त्यांच्या कल्याणासाठी काम करत आहोत”.

हे ही वाचा<< Budget 2024: निर्मला सीतारमण यांच्या साडीचं ‘राम’ नातं! २०१९ पासून बजेटसाठी नेसलेल्या साड्यांचे ‘हे’ अर्थ माहित आहेत का?

यंदाचा अर्थसंकल्प हा निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला सर्वात कमी वेळेतील अर्थसंकल्प होता. यात आवश्यक व महत्त्वाच्या घोषणा न झाल्याचे म्हणत यावर अनेकांनी टीका केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big announcement 12 hours working three days week off salary employees nirmala seetharaman budget 2024 pib clears viral post svs
Show comments