Big Boss Marathi Suraj chavan : ‘बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये ट्विस्टवर ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. मात्र, अल्पावधीतच या कार्यक्रमाने लोकप्रियता मिळवली. पहिल्या दिवसांपासून बिग बॉसच्या घरात होणाऱ्या वादांमुळे काही स्पर्धक तर चर्चेत आहेतच पण त्याचबरोबर काही स्पर्धकांना प्रेक्षकांचा सपोर्ट मिळतोय. बिग बॉस मराठीच्या घरातील रिल्स स्टार सूरज चव्हाणला प्रेक्षकांचा मोठा सपोर्ट मिळत आहे, त्याचा निरागसपणा आणि प्रामाणिकपणा सगळ्यांनाच भावतोय. सुरज मुळचा बारामतीचा असला तरी त्याला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय. अशातच आता एका समाज प्रबोधनकार महाराजांनी आपल्या किर्तनात सूरज चव्हाणचं तोंड भरून कौतुक केलं आहे. तसंच सूरजचा संघर्ष तरुणांसमोर मांडला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही सूरजचं कौतुक कराल.

बऱ्यापैकी सगळ्यांना सूरजा इथपर्यंतचा संघर्ष माहिती असेल. मात्र त्यातही समाज प्रबोधनकार प्रा. निलेश महाराज कोरडे यांनी सूरजबरोबर घडलेल्या अशा काही घटना सांगितल्या आहेत की तुमचेही डोळे पाणावतील.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Savlyachi Janu Savli
Video: “आई मला वाचव…”, सारंगचा जीव संकटात? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत पुढे काय होणार? वाचा…
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
Punha Kartvya Aahe
Video: “तू काय प्रेम करणार?”, आकाशची वसुंधरावर नाराजी; प्रेक्षकांनी केले कौतुक, म्हणाले, “तुमची जोडी…”

महाराज या व्हिडीओमध्ये सांगतात, “बिगबॉसचं गणीत एक लक्षात घ्या, बिगबॉस चांगलं का वाईट हे बाजूला ठेवा. पण इथं सगळ्या तरुण मित्रांना एक वाक्य सांगतो, “आयुष्यात जेव्हा आत्महत्येचा विचार येईल तेव्हा गोलीगत सुरज चव्हाणला आठवा” आणि खऱ्या अर्थाने कोरोनाच्या काळात स्वत: संपल्याची जाणीव झाली तो डीपी दादा (धनंजय पोवार) आठवा. पुढे ते म्हणतात स्वत:चे वडिल गेले तेव्हा जो गोट्या खेळत होता सुरज त्याच्यावर लोक हसले. त्याला सांगितलं तेव्हा तो घरी गेला शेवटचं वडिलांना पाहिलं, कळत नव्हतं नेमकं काय चाललंय. दुसरीकडे आईच्या उपचाराला पैसे नव्हते, सगळ्यांकडे पैसे मागितले पण कोणीही दिले नाही. खोकून खोकून आई समोर गेली पण काही करु शकला नाही. फक्त गणपती बसवायचा म्हणून तीन दिवस कामाला गेला, कष्ट केले. गणपती बाप्पापुरते पैसे जमा केले पण गावातले सुरजसोबत कुणी राहायचं म्हणून गणपती बसवायला कुणी आलं नाही. त्यानं एकट्यानं गणपती बसवला, पण त्याच गणपती बाप्पाचा आज आशीर्वाद पाहा, तिसऱ्या आठवड्यातही सुरज पहिल्याच नंबरवर आहे. त्यामुळे लक्षात घ्या जेव्हा जेव्हा जीवन संपल्याची जाणीव होईल तेव्हा सूरज चव्हाणला बघा. भांडताना सगळ्यांना पाहिलं पण झाडून घेताना कोणाला पाहिलं..सूरजला” हा व्हिडीओ surajchadiwana_005 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “नाच रे मोरा आंब्याच्या वनात” शिक्षक असावा तर असा! साताऱ्यात शिक्षक विद्यार्थ्यांचा जबरदस्त डान्स; VIDEO एकदा पाहाच

यावेळी बिग बॉसच्या घरात , अभिनेते, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि गायक असे सदस्य स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. यातील एका सदस्याची एन्ट्री अनेकांना आधी पटली नव्हती, पण हा सदस्य आता घरातील इतर सदस्यांप्रमाणेच महाराष्ट्राचाही लाडका सदस्य ठरला आहे.

घरातील इतर कलाकार मंडळीसमोर सूरज आधी खूप शांत होता, मात्र बिग बॉसने त्याचा आत्मविश्वास वाढवला आणि मग सूरज गुलीगत नडला. शोमध्ये सूरज एकटा नडतो आणि एकटा भिडतो, सूरजचा हाच स्वभाव महाराष्ट्रातील जनतेच्या पसंतीस उतरला आहे. घरातील इतर सदस्य जिथे प्रसिद्धीझोतात राहण्यासाठी भांडणं आणि लव्हस्टोरीचा अँगल देत आहेत, तिथे साधा भोळा सूरज आपल्या प्रेमळ स्वभावाने प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहे.

Story img Loader