Big Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन सुरू होऊन चार आठवडे झाले आहे. मात्र, अल्पावधीतच या कार्यक्रमाने लोकप्रियता मिळवली. पहिल्या दिवसांपासून बिग बॉसच्या घरात होणाऱ्या वादांमुळे काही स्पर्धक तर चर्चेत आहेतच पण त्याचबरोबर काही स्पर्धकांना प्रेक्षकांचा सपोर्ट मिळतोय. बिग बॉस मराठीच्या घरातील रिल्स स्टार सूरज चव्हाणला प्रेक्षकांचा मोठा सपोर्ट मिळत आहे, त्याचा निरागसपणा आणि प्रामाणिकपणा सगळ्यांनाच भावतोय. सुरज मुळचा बारामतीचा असला तरी त्याला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय. अशातच आता आता मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर सुरच्या सपोर्टचे पोस्टर झळकत आहेत. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

यावेळी बिग बॉसच्या घरात , अभिनेते, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि गायक असे सदस्य स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. यातील एका सदस्याची एन्ट्री अनेकांना आधी पटली नव्हती, पण हा सदस्य आता घरातील इतर सदस्यांप्रमाणेच महाराष्ट्राचाही लाडका सदस्य ठरला आहे.टिक टॉक स्टार आणि रिल स्टार सूरज चव्हाणची बिग बॉसमध्ये एन्ट्री झाली तेव्हा अनेकांनी बिग बॉस शोला ट्रोल केलं. पण, याच सूरज चव्हाणने आता अवघ्या महाराष्ट्राचं मन जिंकलं आहे.घरातील इतर कलाकार मंडळीसमोर सूरज आधी खूप शांत होता, मात्र बिग बॉसने त्याचा आत्मविश्वास वाढवला आणि मग सूरज गुलीगत नडला. शोमध्ये सूरज एकटा नडतो आणि एकटा भिडतो, सूरजचा हाच स्वभाव महाराष्ट्रातील जनतेच्या पसंतीस उतरला आहे. घरातील इतर सदस्य जिथे प्रसिद्धीझोतात राहण्यासाठी भांडणं आणि लव्हस्टोरीचा अँगल देत आहेत, तिथे साधा भोळा सूरज आपल्या प्रेमळ स्वभावाने प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहे.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
kiran gaikwad and vaishnavi kalyankar mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘देवमाणूस’ फेम अभिनेता बोहल्यावर चढणार; होणारी पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, पाहा व्हिडीओ
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल
Rahul Gandhi Narendra Modi Gautam Adani (2)
VIDEO : संसदेच्या आवारात राहुल गांधींनी घेतली ‘मोदी-अदाणीं’ची मुलाखत? विरोधी खासदारांनीच घातले मुखवटे
Punha Kartvya Aahe
Video: “तू काय प्रेम करणार?”, आकाशची वसुंधरावर नाराजी; प्रेक्षकांनी केले कौतुक, म्हणाले, “तुमची जोडी…”

याच सूरजच्या सपोर्टचे पोस्टर सध्या मुंबईतील मरीन ड्राईव्हवर पाहायला मिळाले. या पोस्टरवर तुम्ही पाहू शकता, “मुंबईमधून आपल्या सूरज भावाला फूल सपोर्ट” असा बॅनर तरुणांनी झळकवला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: टीटीई बनून ट्रेनमध्ये शिरली अन् फसली; चालाख प्रवाशांनी पाहा कशी केली पोलखोल, तरी ‘रुबाब’ नाही हटला

नेटकऱ्यांचा ‘गुलीगत किंग’ला फुल सपोर्ट

सोशल मीडियावर हा व्हिडीओ its_me_nil__09 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरीही भरभरुन कमेंट करत सुरजला प्रेम देत आहेत. एकानं कमेंट केलीय की, “बिग बॉस मराठी ५ चा विजेता सूरज चव्हाणच” आणखी काही कमेंट पुढील प्रमाणे, खूप छान वाटतं एका गरीब मुलाला सपोर्ट करताय हे बघुन” “एखाद्याला ग्राऊंड लेव्हलला येऊन सपोर्ट करणं ही खूप मोठी गोष्ट आहे”‘सूरज चव्हाण रिस्पेक्ट बटन’. आणखी एकाने लिहिलंय, ‘ज्याच्या मुळे शोचा TRP वाढला असा एकमेव स्पर्धक म्हणजे सूरज’.

दरम्यान तुम्ही बिग बॉसच्या घरात कुणाला सपोर्ट करताय हे आम्हाला कमेंट करुन नक्की सांगा.

Story img Loader