सोशल मीडियावर समुद्रात धावणाऱ्या एका बोटीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. कारण एका मोठ्या माशानं पाण्यात फिरणाऱ्या बोटीवरून थेट पलीकडे उडी मारल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. एरव्ही मासेमारी साठी बोटीतून मच्छीमार प्रवास करतात, तेव्हा माशांना जाळ्यात पकडल्याचं आपण पाहतो. पण या माशानं सुपरमॅनसारखी उडी मारल्यानं मच्छीमारांनाही एकप्रकारे आव्हानंच दिल्यासारखं या व्हिडीओत दिसत आहे. मासे समुद्रात ठरावीक उंचीवरच उड्या मारत असतात, पण एवढ्या मोठ्या बोटीवरून माशाने उडी मारून पलीकडे जाणं, हे डोळ्यांवर विश्वास न बसण्यासारखंच आहे, असं म्हणता येईल.
समुद्रात मोठ मोठे मासे पोहत असतात. शार्क, व्हेल, डॉल्फीनसारखे मासे समुद्राच्या तळाशी तर असतातच पण कधी कधी ते पाण्याच्या वरच्या पातळीवरही येताना दिसतात. पण बोटीवरून दुसऱ्या बाजूला उडी मारण्याचा अशाप्रकारच्या माशाचा व्हिडीओ क्वचितच पाहिला असेल. कारण इतक्या चपळाईने माशाने बोटीवरू उडी मारून पुन्हा पाण्यात जाण्याचा कारनामा केलेला पाहून आश्चर्य तर वाटणारच. @ranthambore.vibes या नावाच्या युजरने हा थरारक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना धक्काच बसला आहे.
इथे पाहा व्हिडीओ
समुद्राच्या मधोमध एक बोट प्रवास करत असते. त्या बोटीत काही माणसं बसलेली असतात. ही माणसं त्यांच्या धुंदीत प्रवास करत असताना अचानक समोरुन एक मोठा मासा पलीकडे उडी मारतो. मासा अशाप्रकारे उडी मारून थेट पलीकडे निघून जाईल, याचा अंदाजही बोटीत प्रवास करणाऱ्यांना आला नसावा. डोळ्याची पापणी मिटता न मिटता हा मासा वाऱ्याच्या वेगानं सुमद्रात पुन्हा उडी मारतो, असं दृष्य या व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही, कारण व्हिडीओतील दृष्य अविश्वसनीय आहेत. समुद्रातील माशाने भन्नाट उडी मारून मच्छीमारांनाही खुलं आव्हान दिल्यासारखं आहे. अशा माशांना पकडण्यासाठी बुद्धीचा किती कस लावावा लागत असेल, याचा अंदाजही बांधता येणार नाही.