सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी यातील काही व्हिडीओ पाहून तुम्हाला खूप आनंद होतो, तर काही व्हिडीओ पाहून धक्काच बसतो. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हालाही काळजात एकदम धस्स होईल. तसेच एखादे पालक आपल्या मुलांबाबत इतके निष्काळजी कसे असू शकतात असा प्रश्न पडेल. या व्हिडीओमध्ये दोन मुलं उंच इमारतीवर चढून असा काही जीवघेणा खेळ खेळत आहेत, जो पाहतानाही भीती वाटतेय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन उंच इमारतींच्या टॅरेसवर दोन मुलं कशाचाही आधार न घेता आरामात उभी आहेत. यातील एका मुलाने पिवळे कपडे घातले आहेत, तर दुसऱ्याने तपकिरी रंगाचा टीशर्ट घातला आहे. ही दोन मुलं वेगवेगळ्या टॅरेसवर उभी आहेत. या व्हिडीओमध्ये पुढे ही मुलं असं काही करतात, जे पाहून तुम्हालाही धक्का बसेल. तुम्हाला दिसेल की, तपकिरी रंगाचा टीशर्ट घातलेला मुलगा इमारतीच्या टॅरेसवरून दुसऱ्या इमारतीच्या टॅरेसवर उडी मारण्याची तयारी करतो आणि थोड्याच वेळात उडीही मारतो. तो मुलगा एकदा नाही तर तीन वेळा अशाप्रकारचा जीवघेणा खेळ करत असतो. व्हिडीओमध्ये तुम्ही ही इमारत किती उंच आहे हे देखील पाहू शकता. जर मुलाच्या हातून थोडीशी चूक झाली असती किंवा त्याचा पाय घसरला असता तर जीव गमावण्याशिवाय त्याच्याकडे दुसरे कोणतेच ऑप्शन नव्हते. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

@CCTV IDIOTS नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जो आत्तापर्यंत ३५०० हून अधिक लोकांनी लाइक केला आहे. हा धक्कादायक व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने लिहिले – काय पालक आहेत? दुसर्‍या युजरने लिहिले की, मी असे करण्याचे धाडस कधीच करू शकत नाही; तर आणखी एका व्यक्तीने लिहिले की, त्यांनी भीती विकली आहे? या व्हिडीओवर तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big negligence of parents caught in camera shocking video goes viral sjr