Shark Fish Shocking Video Viral : खोल समुद्रातील शार्क माशाचा एक थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. समुद्रात असलेल्या एका हुकला चक्क शार्क मासा अडकल्याचं एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. शार्क माशाचा हा थरकाप उडवणारा व्हिडीओ अमेरिकेच्या फ्लोरिडा येथील आहे. शार्क मासा पाण्यात टाकलेल्या मोठ्या हुकला अडकल्याचं कळताच स्कूबा डायव्हरने तातडीने पाण्यात उडी मारली अन् पुढे जे काही घडलं ते पाहून तुम्हीही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. शार्क माशाचा हा खतरनाक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.

इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ @Tez Felde नावाच्या यूजरने पोस्ट केला आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक शार्क मासा पाण्यात असलेल्या हुकला अडकला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये म्हटलंय की, आम्हाला डेस्टिन फ्लोरिडा येथील समुद्रात शार्क मासा संकटात असल्याचं समजलं. शार्कच्या तोंडात एक मोठा हुक अडकला होता. त्यानंतर स्कूबा डायव्हरने तातडीने बचाव कार्य सुरु केलं. परंतु, सुरुवातीला शार्कची सुटका करण्यात आम्हाला अपयश आलं. त्यानंतर आमच्या एका सहकाऱ्याने हुक तोडलं आणि शार्कची सुखरूप सुटका केली.

Farmer killed in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Snake Bites Man Viral Video
जंगलात तब्बल ७ सापांशी खेळत होता तरुण, इतक्यात एकाने काढला फणा अन्…; पाहा काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO
russian spy whale mystery
बहुचर्चित बेलुगा व्हेलचे रहस्य उलगडले; हा मासा खरंच रशियन गुप्तहेर होता का?
One died in an accident, accident Ovala Naka,
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू, ओवळा नाका येथील घटना
bull Fight Viral Video | Bull Attack on boy Wearing Red Shirt
“शिंगांनी उडवलं अन् लाथांनी तुडवणार इतक्यात…”, पिसाळलेल्या बैलाचा व्यक्तीवर हल्ला; पाहा थरारक Video
Mother Saved Her Daughters Life Who Had Drowned In The Sea Thrilling Video Went Viral
एक लाट अन् माय-लेकींचा थेट मृत्यूशी सामना; नेमकं काय घडलं? Shocking Video पाहून अंगाचा थरकाप उडेल

नक्की वाचा – VIDEO: प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसला लागली आग, राष्ट्रीय महामार्गावर आगीचं तांडव, लोकांची झाली पळापळ

इथे पाहा शार्क माशाचा थरारक व्हिडीओ

इन्स्टाग्रामवर २५ जुलैला शेअर केलेल्या या पोस्टला अनेक लोकांनी लाईक केलं आहे. शार्कचा जीव वाचवल्यामुळे लोकांनी स्कूबा डायव्हरवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका यूजरने म्हटलं, शार्कची मदत करण्यासाठी धन्यवाद. मी तुमचा आदर करतो. अन्य एका यूजरने म्हटलं, शार्क माशाला वाचवण्यासाठी केलेलं कार्य कौतुकास्पद आहे. समुद्राच्या खोल पाण्यात शार्क माशांनी माणसांवर हल्ला केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पण या स्कूबा डायव्हर्सने शार्कला वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.