Shocking Incident On Navarre Beach Viral Video : समुद्राच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांना भयानक प्रसंगाला सामोरं गेल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फ्लेरिडाच्या नवारे समुद्र किनाऱ्यावर महाकाय शार्क मासा फिरत असल्याचं समोर आलं आहे. एकीकडे पर्यटक पाण्यात मौजमजा करत असताना दुसऱ्या बाजूला मोठा शार्क मासा पाण्यात घिरट्या घालत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. या बीचवर शार्क मासे आढळत असल्याने पर्यटकांना सावधानतेचा इशाराही दिला जातो. शार्क मासा माणसांची शिकार करत असल्याने त्याच्यापासून चार हात लांब राहणेच योग्य ठरते. पण काही पर्यटक जीव धोक्यात टाकून समुद्रात पोहायला जातात आणि शार्कसारख्या खतरनाक माशाची शिकार होतात. या समुद्रातही शार्क मासा शिकारीच्या शोधात फिरत असल्याचा व्हिडीओ कॅमेरात कैद झाला आहे.
@wxkaitlin नावाच्या ट्वीटर यूजरने शार्क माशाचा हा व्हिडीओ इंटरनेटवर शेअर केला आहे. नवारे समुद्र किनाऱ्यावर शार्क मासा माणसांच्या खूप जवळ फिरत असल्याचं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. शार्क माशाचे दृष्य क्रिस्टी कॉक्स नावाच्या व्यक्तीने शूट केले आहे. शार्क मासा डॉल्फीनसोबत पाण्यात फिरत होता. शार्क पाण्यात शिकारीचा शोध घेत आहे, असं वाटत होतं. पण काही वेळानंतर ते मासे गायब झाले, असं कॉक्स यांनी म्हटलं आहे.
इथे पाहा व्हिडीओ
५६ सेकंदांच्या या व्हिडीओ क्लिपला २२ हजारांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तसंच या व्हिडीओला नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. नवारे समुद्र किनाऱ्यावर शार्क माशाचं फिरणं नवीन गोष्ट नाहीय. फक्त शार्क माशापासून पर्यटकांनी सावध राहून स्वत:चा जीव वाचावला पाहिजे, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर दुसरा एक नेटकरी म्हणाला, शार्क मासा लंच करण्यासाठी माणसांच्या शिकारीचा शोध घेत आहे.