Dhananjay Powar Bigg Boss Marathi Season 5 :  सर्वांचा लाडका असलेल्या डीपी दादाच्या स्वागतासाठी कोल्हपुरकरांनी जंगी तयारी केल्याची पाहायला मिळते आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ठसकेबाज कोल्हापूरी वाणी तसेच विनोदी शैलीमुळे धनंजय चर्चेत आला. अशातच ‘बिग बॉस’ मधून बाहेर पडल्यानंतर त्यानं गावाच्या दिशेने मार्गस्थ झाला. यावेळी धनंजय पोवारच्या स्वागतासाठी अख्ख कोल्हापूर रस्त्यावर आलं होतं. भव्यदिव्य अशी मिरवणूक यावेळी धनंजयची काढण्यात आली. स्वागतासाठी कोल्हापूर नगरी सजवली गेली होती. मोठा डीजे सेटअप तसेच बॅनर लावून डीपीचे चाहते स्वागत करण्यासाठी जमले होते. दरम्यान आता डिपीचं कोल्हापूरात आगमन झाल्यानंतर त्याच्या एका कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे.

 कोल्हापूरचा रांगडा गडी म्हणून धनंजय पोवारने बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली होती. धनंजयचा खेळ हा सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचं पाहायला मिळत होतं. मात्र अवघ्या काही पावलांवर त्याचं ट्रॉफीचं स्वप्न अर्धवट राहिलं आहे. धनंजय हा टॉप ६ मध्ये जाणारा तिसरा स्पर्धक होता. तसेच धनंजयच ही ट्रॉफी उचलणार अशी जोरदार चर्चाही सोशल मीडियावर होती. विनोदी शैलीमुळे बिग बॉसच्या घरातलं धनंजय वातावरण अगदी हलकं केलं होतं. त्याचप्रमाण टास्कही तो तितक्याच जिद्दीने खेळला असल्याचंही पाहायला मिळालंय. अशातच या रांगड्या गड्याचं कोल्हापूरात जोरदार स्वागत झालं. यावेळी धनंजयनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्यानं सर्वात आधी अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालत अभिवादन केलं.

Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
EK Radha Ek Meera
गश्मीर महाजनी व मृण्मयी देशपांडे एकत्र झळकणार; ‘या’ मराठी चित्रपटातून भेटीला येणार, जाणून घ्या रिलीज डेट
jayant patil Sarcastic speech to rular party on last day of Winter session of the legislature
एक मुख्यमंत्रीही काफी है! इतरांची गरज नाही, जयंत पाटलांची टोलेबाजी
Navri Mile Hitlarla
Video: “मेरी दिल की…”, एजे-लीलाचा रोमँटिक अंदाज; प्रोमो पाहताच नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया, म्हणाले, “आमच्या भावनांशी…”
buldhana protest against home minister amit shah
अमित शहांचा पुतळा जाळला…राष्ट्रमाता जिजाऊंच्या माहेरी जमलेल्या आंदोलकांनी…
shahrukh khan Abhishek bachchan dance with children video viral
आराध्या-अबरामचा मंचावर, तर विद्यार्थ्यांबरोबर शाहरुख खान अन् अभिषेक बच्चनचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

धनंजयच्या याच कृतीने कोल्हापूरकरांबरोबरच नेटकऱ्यांचीही मनं जिंकली. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, भर चोकात हजारोंची गर्दी धनंजयच्या स्वागताला जमली आहे. हा व्हिडीओ शेअर करताना धनंजयने “जे जिंकायचं होत तेच जिंकलं, ही त्याची पोच पावती” असं कॅप्शन लिहलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: वेळ प्रत्येकाची येते! सूरजचं ‘ते’ वाक्य खरं ठरलं; बिग बॉसमध्ये जाण्याआधी काय म्हणाला होता एकदा पाहाच

dhananjaypowar_dp नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेक जण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हटलंय, “ओन्ली डीपी भाऊ जिंकलस भावा”, “शिवाजी महाराज की जय” अशा अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

Story img Loader