Bigg Boss Marathi 5 Winner: ‘बिग बॉस मराठी’ सीझन पाचच्या विजयानंतर रिल्सस्टार सूरज चव्हाण याचं राज्यभरात कौतुक होत आहे. राज्यभरातून अनेक दिग्गज कलाकारांकडून सूरजचं अभिनंदन केलं जात आहे. सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात गेला तेव्हा एक रिल्सस्टार म्हणून प्रसिद्ध होता. पण सूरजचा खेळ, सूरजचा प्रामाणिकपणा, सूरजचा वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष यामुळे तो चाहत्यांचा जास्त प्रिय होत गेला. त्याचा चाहत्यांचा प्रचंड पाठिंबा शेवटपर्यंत मिळत गेला. अखेर सूरजच्या चाहत्यांनी त्याला शेवटपर्यंत साथ देत विजयी केलं आहे. त्यामुळे सूरजच्या संघर्षाला मोठं यश मिळालं आहे. मात्र एक वेळ अशीही होती जेव्हा सुरजच्या बाजूलाही लोक उभे राहत नव्हते. त्याचे व्हिडीओ काढायला कोणी मोबाइलही पकडायला नव्हतं. मात्र आजची वेळ अशी आहे की सूरजभोवती लाखोंची गर्दी पाहायला मिळतेय. दरम्यान बिगबॉसच्या घरात जाण्याआधी सूरजनं बोलेलं एक वाक्य आता खरं ठरत आहे. सूरजचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल खरं करुन दाखवलंस भावा.

सूरजचा इथपर्यंतचा प्रवास खूप संघर्षमय होता. दोन वेळच्या जेवणासाठीही त्याला संघर्ष करावा लागत होता. एक वेळ अशी आलेली की, आईच्या उपचाराला पैसे नव्हते, सगळ्यांकडे पैसे मागितले पण कोणीही दिले नाही. खोकून खोकून आई समोर गेली पण काही करु शकला नाही. फक्त गणपती बसवायचा म्हणून तीन दिवस कामाला गेला, कष्ट केले. गणपती बाप्पापुरते पैसे जमा केले पण गावातले सुरजसोबत कुणी राहायचं म्हणून गणपती बसवायला कुणी आलं नाही. त्यानं एकट्यानं गणपती बसवला, पण त्याच गणपती बाप्पाचा आज आशीर्वाद पाहा. त्याचा स्वत:वर आत्मविश्वा होता, एक दिवस नक्कीच काहीतरी करुन दाखवणार आणि ते त्यां करुनही दाखवलं. त्याच्या जुन्या व्हिडीओतूनही हेच समोर आलं आहे.

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
pune video
हे काय चाललंय पुण्यात! बेशिस्तपणाचा कळस; थेट फुटपाथवरून चालवताहेत गाड्या, VIDEO होतोय व्हायरल
Bride and groom stand still when national anthem played in wedding ceremony and photoshoot viral video on social media
“जेव्हा लग्नाचा हॉल एखाद्या शाळेत असतो”, लग्नसोहळ्यात फोटोशूट सुरू असताना नवरा नवरी अचानक झाले स्तब्ध; VIDEO पाहून वाटेल अभिमान
Shocking Video : Pune PMT Bus Front Glass falls off due to high speed
Pune Video : “आणखी वेगाने चालवा”, पीएमटी बसने मारला ब्रेक अन् अख्खी काच…. Viral video पाहून नेटकरी संतापले
Shocking video dehradun raipur two girls fight for boy friend video viral on social media
कपडे फाटले तरी त्या थांबल्या नाही; एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
Little boy funny video after he was fail in exam I was in tension due to failure, but my friend also failed
शाळेत नापास झाला चिमुकला, म्हणाला “आधी टेन्शन होतं पण…” मंडळी मजेदार VIDEO चा शेवट अजिबात चुकवू नका

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बिगबॉसच्या घरात जाण्याआधी सूरज व्हिडीओ बनवायचा, असाच एक व्हिडीओ बनवताना त्याला आलेला अनुभव त्यानं व्हिडीओतून समोर आणला. व्हिडीओमध्ये तो म्हणतो, “वाईट कमेंट करणाऱ्यांनो तुम्ही कमेंटच करणार आणि मी जिंकून आलो ना की तु्म्ही फोटोच काढणार आणि म्हणणार सूरज भाऊ बिग फॅन गोलिगत”

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “दिवस बदलतात मित्रा” या व्हिडीओतून सुरजचं करिअर झालं होतं सुरू; टिक-टॉकवरचा तो पहिला गोलिगत VIDEO व्हायरल

swapnil_rasal143 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेक जण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “करुन दाखवल राव”, तर आणखी एकानं ‘मरीआई पावली! भावाचे वाक्य खर ठरले..” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Story img Loader