Bigg Boss Marathi 5 Winner: ‘बिग बॉस मराठी’ सीझन पाचच्या विजयानंतर रिल्सस्टार सूरज चव्हाण याचं राज्यभरात कौतुक होत आहे. राज्यभरातून अनेक दिग्गज कलाकारांकडून सूरजचं अभिनंदन केलं जात आहे. सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात गेला तेव्हा एक रिल्सस्टार म्हणून प्रसिद्ध होता. पण सूरजचा खेळ, सूरजचा प्रामाणिकपणा, सूरजचा वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष यामुळे तो चाहत्यांचा जास्त प्रिय होत गेला. त्याचा चाहत्यांचा प्रचंड पाठिंबा शेवटपर्यंत मिळत गेला. अखेर सूरजच्या चाहत्यांनी त्याला शेवटपर्यंत साथ देत विजयी केलं आहे. त्यामुळे सूरजच्या संघर्षाला मोठं यश मिळालं आहे. मात्र एक वेळ अशीही होती जेव्हा सुरजच्या बाजूलाही लोक उभे राहत नव्हते. त्याचे व्हिडीओ काढायला कोणी मोबाइलही पकडायला नव्हतं. मात्र आजची वेळ अशी आहे की सूरजभोवती लाखोंची गर्दी पाहायला मिळतेय. दरम्यान बिगबॉसच्या घरात जाण्याआधी सूरजनं बोलेलं एक वाक्य आता खरं ठरत आहे. सूरजचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल खरं करुन दाखवलंस भावा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा