Bigg Boss Marathi 5 Winner: रिल्सस्टार सूरज चव्हाण बिग बॉस सीझन पाचचा विजेता ठरला आहे. बिग बॉस मराठी सीझन पाचचा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला आहे. बिग बॉसच्या या पाचव्या सीझनमध्ये सूरज चव्हाण हा विजयी ठरला आहे. सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात गेला तेव्हा एक रिल्सस्टार म्हणून प्रसिद्ध होता. पण सूरजचा खेळ, सूरजचा प्रामाणिकपणा, सूरजचा वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष यामुळे तो चाहत्यांचा जास्त प्रिय होत गेला. त्याचा चाहत्यांचा प्रचंड पाठिंबा शेवटपर्यंत मिळत गेला. अखेर सूरजच्या चाहत्यांनी त्याला शेवटपर्यंत साथ देत विजयी केलं आहे. त्यामुळे सूरजच्या संघर्षाला मोठं यश मिळालं आहे. आणि याच चाहत्यांनी सुरजच्या विजयानंतर जल्लोष केलाय, तर पुणेकरांनी लावलेला अंदाजही खरा ठरत ‘सुरज’चा गुलीगत विजय झालाय.

दरम्यान या सगळ्यात एका कारची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगलीय. सुरजच्या एका फॅनने सुरजला खंडोबाला घेऊन जायला चक्क मोठी आलिशान कारच आणली आहे. एवढंच नाहीतर या कारवर सगळीकडे सूरजच्या विजयाचे फोटो लावण्यात आले असून दोन दिवसांआधीच त्यांनी सूरजला विजयी घोषीत केलं होतं.

Paaru
Video : अनुष्का आदित्यच्या घरातील व्यक्तीचा अपघात घडवून आणणार? पारूला सत्य समजणार का? पाहा प्रोमो
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Uber driver gets review as a good kisser from customer post viral on social Media
“चांगला किस करणारा”, ड्रायव्हरचा असा रिव्ह्यू तुम्ही कधीच ऐकला नसेल, ‘या’ व्हायरल पोस्टमध्ये नेमकं आहे तरी काय
Siddharth Statement on crowd of 'Pushpa 2'
‘पुष्पा २’च्या ट्रेलर लाँचवेळी पाटण्यात जमलेल्या गर्दीवर सिद्धार्थचं वक्तव्य; म्हणाला, “जेसीबीचं काम सुरू असताना…”
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
Man beaten Young woman on stage who was performing shocking video viral on social media
कोणाच्या परिस्थितीचा असा फायदा घेऊ नका! त्याने भरस्टेजवरच तरुणीबरोबर ‘असं’ काही केलं की…, VIDEO पाहून येईल संताप
Auto driver written a message on back side of his auto goes viral on social media
“प्रेम एक कला पण…” रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं वयात येणाऱ्या तरुणाईला दिला सल्ला; PHOTO पाहून तुमचं मत नक्की सांगा
Elder man bike stunt with cylinder went viral on social media viral video
आयुष्याचा असा खेळ करू नका! सिलेंडरवर बसून चालत्या बाईकवर आजोबा करतायत स्टंट, VIDEO पाहून बसेल धक्का

कारची सोशल मीडियावर का होतेय तुफान चर्चा?

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा तरुण सांगत आहे की, आता सुरजला याच गाडीतून खंडोबाला घेऊन जाणार आहे. ही व्हॅनिटी व्हॅन खास सुरजसाठी तयार करण्यात आली असल्याचंही हा तरुण सांगत आहे. दरम्यान या गाडीवर दोन दिवसांआधीच सुरज चव्हाणच्या विजयाचे पोस्टर लावण्यात आले होते. ही कार याआधी पुण्यातील एफ.सी रोडवर दिसली होती, तेव्हाच पुणेकरांनी सुरजला विजयी घोषित केलं होतं आणि काल अधिकृतपणे सुरजने बिग बॉस मराठी सीझन पाचच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं, त्यामुळे पुणेकरांनी लावलेला अंदाज हा खरा ठरला आहे.

पुणेकरांचा अंदाज खरा ठरला

पुण्यातल्या एफ.सी रोडवर याच कारवर सुरज चव्हाणचा विजेता म्हणून पोस्टर लावण्यात आलं होतं. त्यावर बाई काय हा प्रकार SQ, RQ, ZQ WINNER असं लिहलं आहे. तसेच सुरजला वोट करण्याचं आवाहनही केलं होतं. या गाडीला पाहून पुणेकरांनीही सुरजचं विजयी झाला पाहिजे अशी सहमती दर्शवली होती, सगळेच ही कार पाहून थांबत होते आणि हो सूरजच विजयी होणार अशी प्रतिक्रिया देत होते. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: पुणेकरांनी बिग बॉसचा विजेता ठरवला! कारवर लावलं असं पोस्टर की पाहून सगळेच थांबू लागले; पाहा कोण होणार विजेता

सोशल मीडियावर हे व्हिडीओ raj_shinde6666 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आले आहेत. यावर नेटकरीही भरभरुन कमेंट करत सुरजला प्रेम देत आहेत. 

Story img Loader