Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli famous dialogues : बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये एकापेक्षा एक स्पर्धक सहभागी झाले आहेत. त्यातली एक म्हणजे निक्की तांबोळी. निक्कीचे घरातील प्रत्येक सदस्यांबरोबर वाद झाले आहेत. निक्कीची घरात एन्ट्री झाल्यानंतर एक डायलॉग बराच लोकप्रिय झाला तो म्हणजे बाईईई…! छोट्या पुढारीशी संवाद साधताना निक्कीद्वारे बोलण्यात आलेल्या या डायलॉगवर सोशल मीडियावर अनेक रिल्स बनवण्यात आले. तर आज सोशल मीडियावर एक अनोखा व्हिडीओ ( Video) व्हायरल होत आहे; यामध्ये एका चिमुकल्याने त्याच्या आजीसाठी निक्कीच्या डायलॉगवर गाण बनवलं आहे.

अनेक स्त्रिया आजही दात स्वछ करण्यासाठी तंबाखू जाळून केलेली पूड (मशेरी) वापरतात. पण, तंबाखूत निकोटिन हे रसायन असते, ज्यामुळे रक्तदाब वाढणे यासारखे आजार होऊ शकतात, म्हणून ते न वापरणंच योग्य. त्यामुळे घरातील अनेक जण आई,आजीला मशेरी लावू नको असे वारंवार सांगत असतात. पण, आज एका चिमुकल्याने आजीसाठी खास गाणं तयार केलं आहे. या गाण्यात निक्कीच्या डायलॉगचा ट्विस्ट सुद्धा आहे. नक्की चिमुकल्याने कसं गाणं गायलं व्हायरल व्हिडीओतून ( Video) तुम्हीसुद्धा बघा…

pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
uncle aunty amazing dance on tauba tauba song
तौबा तौबा! काका काकूंनी केला जबरदस्त डान्स; Viral Video एकदा पाहाच
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “आमच्याकडे मान-अपमान मनात होतो अन् त्याचं संगीत…”, देवेंद्र फडणवीसांची टोलेबाजी!
punha kartvya aahe
Video: “तुम्ही कितीही दूर…”, वसुंधराने केला सासूचे मन जिंकण्याचा निर्धार; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत नवीन वळण, पाहा प्रोमो
Video of couple kissing metro station platform
मेट्रो स्टेशनवर ‘किस’ करणाऱ्या जोडप्याचा ‘तो’ Video Viral; नेटकरी म्हणे, “यात गैर काय”
kumar vishwas sonakshi sinha ramayana
“तुमच्या घरातील ‘श्री लक्ष्मी’ कोणी…”, कुमार विश्वास यांची सोनाक्षी सिन्हाच्या आंतरधर्मीय लग्नावर टीका; म्हणाले, “मुलांना रामायण…”

हेही वाचा…‘दहा दिवस बाप्पा…’ मंडपात निरोपदिनी चिमुकला मूर्तीजवळच झोपला; पाहा सेवकाचा हा VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

बाईईई… काय हा प्रकार शी…

व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिलं असेल की, बाप्पा घरात विराजमान झाले आहेत. आजीचा नातू नेहमी तिला मशेरी लावताना पाहतो व त्याला ती गोष्ट अजिबात आवडत नाही . म्हणून आजीची मशेरी बहुदा तो कुठेतरी लपवून ठेवतो आणि म्हणतो की, “बाईईई… मशेरी कुठे गेली, बाईईई… कुठे गेली आता शोध, बाईईई… काय हा प्रकार शी, बाईईई…” असं गाणं म्हणण्यास सुरुवात करतो. यादरम्यान त्याचे मजेशीर हावभाव, त्याचा डान्स देखील पाहण्यासारखा आहे ; जो पाहून तुम्हालाही हसू येईल.

व्हिडीओ गणेशोत्सवादरम्यान आहे. घरात गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत आणि त्यादरम्यान ही मजा-मस्ती सुरु आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ (Video) @urmila_zore_kadam या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘जेव्हा नातू आजीला मशेरी लावताना बघतो तेव्हा’ ; अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. हे अनोखं गाणं आणि चिमुकल्याचे हावभाव पाहून नेटकरी सुद्धा थक्क झाले आहेत आणि पोट धरून हसताना कॅमेंटमध्ये दिसून आले आहेत.

Story img Loader