Suraj Chavan Viral Video: सोशल मीडियावर सातत्याने नवनवीन गाण्यांचा ट्रेंड बदलत असतो. कधी ‘गुलाबी साडी’, कधी ‘सुसेकी’, तर कधी ‘तौबा तौबा’ ही भारतीय चित्रपटांमधील गाणी सध्या भारतामध्ये खूप चर्चेत आहेत. त्यावर लाखो युजर्सनी रील्स बनलेल्या तुम्ही पाहिलं असेल. या गाण्यांबरोबर त्या गाण्यांमधील हुक स्टेप्सदेखील खूप चर्चेत असतात. सध्या सोशल मीडियावर सामीये हे गाणं खूप चर्चेत असून, या गाण्याची हुक स्टेपही खूप चर्चेत आहे. या गाण्यावर रील स्टार सुरज चव्हाणचा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या ‘बिग बॉस मराठी ५’ खूप चर्चेत असून, त्यातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. या सीझनमध्ये रील स्टार सुरज चव्हाणचीदेखील स्पर्धक म्हणून निवड करण्यात आली आहे. सुरजच्या साध्या, शांत स्वभावाने व निर्मळ मनाने अनेकांची मने जिंकली आत. ‘बिग बॉस मराठी ५’मध्ये जाण्यापूर्वी सुरजचा एक व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता, त्यामध्ये त्याने सूरज तमीळ भाषेतील ‘सामीये’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

सुरज चव्हाणचा व्हिडीओ व्हायरल

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सुरज शेतात जाऊन ‘सामीये’ गाण्यावर रील बनवताना दिसत आहे. पण, यावेळी त्याला त्या गाण्यातील डान्सप्रमाणे हुबेहूब स्टेप करता येत नाही. पण, तरीही तो त्याला जमेल तसा डान्स करतो. सूरजच्या या व्हिडीओवर नेटकरी अनेक प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

या व्हिडीओ सुरजच्या@official_suraj_chavan1151 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याचे तब्बल १.६ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तसेच त्याच्या या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास १७ दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि पाच लाखांहून अधिक लाइक्सही मिळाल्या आहेत. त्यावर अनेक युजर्सही कमेंट्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा: आरारा खतरनाक! ‘हा आनंदच वेगळा…’; सेफ्टी रोपवर लटकणाऱ्या चिमुकल्याचा जबरदस्त डान्स, VIDEO पाहून कराल कौतुक

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरनं लिहिलंय, “भावा, तुला आमचा फुल सपोर्ट.” दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “आजपर्यंत शिव्या घालणारे, वाईट बोलणारे आज सुरजचं गुणगान गातायत. वेळ सर्वांची येते आणि लोक माणसाची वेळ बघून जज करतात.” तिसऱ्या युजरनं लिहिलंय, “गप रे गुलिगत… तुला फुल सपोर्ट आहे. बिग बॉस मराठी सीजन ५ मध्ये आपला.” चौथ्या युजरनं लिहिलंय, “तूच होणार बिग बॉसचा विनर.”