Dhananjay Powar Bigg Boss Marathi Season 5 : सोशल मीडियावर व्हिडिओ करून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेले अनेकजण आपण पाहिले असतील. त्यातीलच एक नाव म्हणजे धनंजय पवार. कोल्हापूरचा रांगडा गडी म्हणून धनंजय पोवारने बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली होती. धनंजयचा खेळ हा सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचं पाहायला मिळत होतं. मात्र अवघ्या काही पावलांवर त्याचं ट्रॉफीचं स्वप्न अर्धवट राहिलं पण त्याचं दुसरं स्वप्न साकार झालं ते म्हणजे वडिलांसोबत ३८ वर्षांपासून असलेला अबोला बिगबॉसमुळं मिटला. अशातच या रांगड्या गड्याचं कोल्हापूरात जोरदार स्वागत होणार आहे. धनंजय पोवारच्या स्वागतासाठी कोल्हापूरकरांनी जंगी तयारी केली आहे, सोबतच त्याचे वडिल स्वत: मैदानात उतरले असून लेकाच्या स्वागाताची तयारी करत आहेत. धनंजयच्या वडिलांचा हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.

लेकाच्या स्वागतासाठी वडील स्वत: उतरले मैदानात

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, यावेळी मोठा डिजे आणि साऊंड सिस्टिमचा बेस याठिकाणी चाहत्यांनी आणला आहे. हा साधासूधा साऊंड सेटअप नसून खास बिगबॉसच्या पॅटर्नमधला हा सेटअप सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. यावेळी धनंजयचे वडिल स्वत: यामध्ये लक्ष घालून सर्व व्यवस्थित पार पडेल याची विचारपूस, चौकशी करत आहेत. एक वेळ ज्या लेकाशी अबोला धरला होता त्याच लेकासाठी आज वडिल अभिमानाने तयारी करत आहेत. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच सगळं काही सांगून जात आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, पोरासाठी बाप म्हणजे समुद्राच पाणी असतं.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: “हे कोल्हापूर हाय भावा” धनंजय पोवरच्या आगमनाला गावात खतरनाक नियोजन; खास बिगबॉसच्या पॅटर्नमध्ये होणार राडा

बिगबॉसच्या घरात चौथ्या क्रमांकापर्यंत जाऊन आलेला स्पर्धक धनंजय पोवार म्हणजेच डीपी दादानं त्याच्या वडिलांच्या भेटीनं बिगबॉसच्या घरात हमसून हमसून रडला होता. पितापुत्राचे नाते पाहून अनेकजण भावूक झाले हेाते. त्याक्षणी त्याला काय वाटलं होतं. हे त्यानं नुकतंच एका मुलाखतीत सांगितलंय. धनंजय पोवारनं वडील कधीही कौतुक करत नसल्याचं म्हटलं होते. या शोमध्ये त्याचे वडील भेटायला आल्यानंतर धनंजय हमसून हमसून रडला. त्याच्या खेळाचं वडिलांनी कौतुक केले. पिता-पुत्राचे हे नाते पाहून अनेकजण भावूक झाले.

dhananjaypowar_dp नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेक जण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “वडिलांची मायाच अशी असते”