Suraj Chavan Dialogue Video: बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता रील्सस्टार सूरज चव्हाणवर आता राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावरही आता त्याचेच व्हिडीओ पाहायला मिळत आहे. कलाकारांसह अनेक राजकीय नेत्यांकडूनही त्याला कौतुकाची थाप मिळत आहे. एक रील्सस्टार म्हणून बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणारा सूरज चव्हाण त्याचा प्रामाणिकपणा आणि त्याने आयुष्यात केलेला संघर्ष यांमुळे चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाला. अख्ख्या महाराष्ट्राने आता त्याला उचलून डोक्यावर घेतलं आहे. बिग बॉसमधील सूरजच्या गेमबरोबर त्याचे डायलॉग्जही खूप प्रसिद्ध झाले. झापुक झुपूक, बुक्कीत टेंगुळ, गुलिगत पॅर्टन या सूरजच्या डायलॉग्जनी तर अनेकांनी वेड लावलंय. अशातच एका ६५ वर्षांच्या काकूंनी सूरजच्या भन्नाट डायलॉगबाजीला अशी काय टक्कर दिली आहे की, ऐकून दोन मिनिटं सूरजपण स्वत:चेच डायलॉग विसरून जाईल. या काकूंनी सूरज चव्हाणचा असा एक डायलॉग म्हणून दाखवला आहे, जो ऐकून उपस्थित लोकही जोरजोरात हसू लागले. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल की, काकूंच्या डायलॉगबाजीला तोड नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा