Bigg Boss Marathi Winner 2024: सध्या अख्ख्या महाराष्ट्रात बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाची मोठी चर्चा आहे. मित्रांच्या कट्ट्यापासून ते बायकांच्या भिशीपर्यंत सगळीकडे बिगबॉसचा विजेता कोण होणार याचीच उत्सुकता होती. अशातच आपल्या झापुक झुपुक स्टाईलनं संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घालणाऱ्या सुरजनं झगमगाटी दुनियेत स्वत:चं स्थान मिळवलं आणि बिगबॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरला.

बिग बॉस मराठी सीझन पाच जिंकल्यानंतर राज्यभरातून सूरज चव्हाण याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सूरज चव्हाण विजेता झाल्याने संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झालाय. आपले प्रयत्न प्रामाणिक असले, आपल्यामध्ये काहीतरी चांगलं करुन दाखवण्याची जिद्द राहिली तर आपल्याला यश हे नक्की मिळतं. कदाचित ते यश आपली परीक्षा घेत असेल, बऱ्याचदा हुलकावणी देत असेल, किंवा बऱ्याचदा संघर्षामुळे आपलं इतकं मानसिक खच्चिकरण होत असेल की आता नको आणि परत मागच्या वाटेला जाऊयात असं वाटत असेल, पण आपण पुन्हा जिद्दीने परिस्थितीला सामोरं गेलो, आपण परिस्थितीशी झगडत राहिलो तर ते यश अखेर आपल्या पायात अक्षरश: लोटांगण घालतं. अन् याचिच प्रचिती देणारा एक व्हिडीओ समोर आलाय. सुरजनं टिक-टॉकवर पोस्ट केलेला हा पहिला व्हिडीओ आहे, याच व्हिडीओतून सुरजचं करिअर सुरू झालं होतं.

Girl takes off her t-shirt while dancing in university in viral video
दिल डूबा दिल डूबा गाण्यावर तरुणीचा अश्लील डान्स; स्टेजवरच टी-शर्ट काढलं अन्…VIDEO पाहून नेटकरी भडकले
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
The young woman hit under the donkey's ear
पाठलाग करणाऱ्या गाढवाबरोबर तरुणीनं केलं असं काही… VIDEO पाहून नेटकरीही झाले अवाक्
The unique friendship of a leopard and a deer
“अशी मैत्री कधी पाहिली नसेल…” बिबट्या आणि हरणाची अनोखी मैत्री; VIDEO पाहून व्हाल थक्क
cutest puppies following traffic rules
Viral Video : ही चाल तुरुतुरु…! रस्ता ओलांडणाऱ्या श्वानाच्या पिल्लांना पाहून नेटकरी पडले प्रेमात; म्हणाले, “फक्त अशी साथ…”
The young man holding paati wrote funny message
“सुंदर बायको भेटायला नशीब नाही, तर..” तरुणाची पाटी चर्चेत, VIDEO होतोय व्हायरल
Bike caught a fire alive man burnt in fire viral video on social media
VIDEO: एक चूक जीवावर बेतली! गाडीला आग लागताच लोक विझवायला गेले; पण पुढच्या क्षणी जे झालं ते पाहून उडेल थरकाप

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सूरज एक हिंदी गाणं बोलत आहे. यावेळी त्याच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी काहीही कमेंट करत त्याची फिरकी घेतली आहे, मात्र याच सूरजला आज लोक डोक्यावर घेत आहेत. यातून एकच सिद्ध होतं ते म्हणजे, वेळ बदलायला वेळ लागत नाही. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, “काय होतास तू काय झालास तू”

पाहा व्हिडीओ

असा सुरु झाला सोशल मीडियाचा प्रवास

सूरजला त्याच्या बहिणीच्या मुलाकडून टिकटॉक या सोशल मीडिया प्लॅटफार्मची माहिती मिळाली. त्याने इतर कोणाच्या मोबाईलवरून एक व्हिडिओ बनवला. पहिलाच व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. मग त्याने मजुरीतून मिळालेल्या पैशातून मोबाईल मिळाला. अन् त्याच्या हटके स्टाईलमुळे सोशल मीडियावर तो प्रचंड लोकप्रिय ला. त्याचे टिकटॉकवर लाखो फॉलोवर्स आहेत. पण संघर्ष त्याच्या जीवनात अजूनही होता. भारतात टिकटॉकवर बंदी आली. मग सूरजने हार मानली नाही. त्याने इंस्टाग्राम व यूट्यूबवर व्हिडिओ सुरु केले. त्या ठिकाणी प्रचंड यश मिळाले.

हेही वाचा >> सूरज चव्हाणच्या आगमनाला गावात खतरनाक नियोजन; २०० किलोचा हार १२ डिजे अन्..सुरजच्या घराबाहेरचा VIDEO व्हायरल

असा आहे सूरज चव्हाणचा प्रवास

मोडवे गावात सूरज चव्हाणचा जन्म झाला. त्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. त्यामुळे त्याचे बालपण इतर सर्वसामान्य मुलांसारखे नव्हते. सूरज लहान असतानाच त्याचे वडिलाचे कर्करोगाने निधन झाले. त्यानंतर आजारपणामुळे आईचे देखील निधन झाले. सूरजला ५ मोठ्या बहिणी आहेत. त्यांनी सूरजचा सांभाळ केला. आई वडिलांचे छत्र हरपल्यामुळे सूरजला मजुरी करावी लागली. त्याला ३०० रुपये दिवसाला मिळत होते. त्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले. त्याचे आठवीपर्यंत शिक्षण झाले असले तरी त्याला मराठी वाचता येत नाही.

viralinmaharashtra नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेक जण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “दिवस बदलतात मित्रा” तर आणखी एकानं “दिवस प्रत्येकाचे येत असतात हे तू सिद्ध करून दाखवलास” अशी प्रतिक्रिया दिली आहे.