Man Vs King Cobra Shocking Video Viral : प्राण्यांनी हल्ला केल्यावर माणसाची वाचण्याची शक्यता असते. पण जगातील सर्वात विषारी साप किंग कोब्राने चावा घेतल्यावर मृत्यू होण्याची दाट शक्यता असते. कारण शरीरात जास्तीत विष सोडण्याची क्षमता या किंग कोब्रा सापामध्ये असते. मात्र, किंग कोब्रासारख्या खतरनाक सापाशी पंगा घेऊन काही लोक त्यांच्या जीव धोक्यात टाकत असतात. अशाच प्रकारचा एक खतरनाक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. एका तरुणाने पाण्यात असलेल्या मोठ्या किंग कोब्रा सापाला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिसाळलेल्या किंग कोब्राने फणा काढून जे काही केलं, ते पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

किंग कोब्राचा हा व्हिडीओ @d_srestha10 नावाच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक विशाल किंग कोब्रा पाण्यात पोहत असताना एक तरुण त्या सापाला पकडण्याचा प्रयत्न करतो. तरुणाने किंग कोब्राची शेपटी पकडताच तो साप फणा काढून त्या तरुणाला चावण्याचा प्रयत्न करतो. किंग कोब्रा त्या तरुणाच्या अंगावर धावतो, तरीही तो तरुण किंग कोब्राल पकडण्याचा प्रयत्न करुन स्वत:चा जीव धोक्यात टाकतो.

नक्की वाचा – Optical Illusion: घनदाट जंगल दिसतोय ना? पण एक वाघही लपलाय, दिसला नसेल तर क्लिक करून बघा

इथे पाहा किंग कोब्राचा खतरनाक व्हिडीओ

तरुणाने किंग कोब्राची शेपटी पकडून त्याला फण्यावर उभा करण्याची धक्कादायक स्टंटबाजी केल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. किंग कोब्राचा हा खतरनाक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्याने व्हिडीओला प्रतिक्रिया देत म्हटलंय, या सापासोबत पंगा घेण्याची आवश्यकता नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Biggest king cobra tried to attack a man in the river see what happens next dangerous video viral on instagram nss