एका विद्यार्थिनीने तिच्या कोचिंग क्लासच्या शिक्षकासोबत पळून जाऊन लग्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. शिवाय आपण स्वखुशीने शिक्षकांसोबत पळून गेल्याची माहिती या मुलीने व्हिडीओद्वारे दिली आहे. ही घटना बिहारमधील बेतिया जिल्ह्यात घडली आहे. बेतिया येथील एका विद्यार्थिनीने तिच्या शिक्षकासोबत पळून जाऊन लग्न केलं असून याप्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी शिक्षकासह अन्य ५ जणांवर मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घरच्यांनी आपल्या प्रियकरावर गुन्हा दाखल केल्याचं समजताच मुलीने स्वत: एक व्हिडीओ प्रसारीत करत आपलं अपहरण झालं नसून, मी स्वखुशीने पळून गेल्याचं सांगितलं आहे. तसंच मुलीने तिच्या घरच्यांना इशारा दिला आहे की, ‘माझ्या पतीच्या आणि त्याच्या घरच्यांच्या विरोधातील अपहरणाचा खोटा गुन्हा मागे घेतला नाही आणि जर सासरच्या लोकांना थोडाजरी त्रास दिला तर तुमच्या विरोधात गुन्हा दाखल करुन हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत घेऊन जाईल’ अशी धमकीही मुलीने दिली आहे.

हेही पाहा- ढाब्यावर विश्रांती घेणाऱ्या लोकांवर काळाने घातला घाला, थरारक Video पाहून अंगावर येईल काटा

मिळालेल्या माहितीनुसार, सिरिसिया पोलीस स्टेशनच्या परिसरातील बारावीत शिकणाऱ्या अंजली नावाची मुलगी आपल्या कोचिंग क्लासच्या शिक्षकासोबत पळून गेली. शिवाय आपण स्वत:हून या शिक्षकासोबत पळून गेल्याचंही मुलीने सांगितलं आहे. अंजलीने आपल्या घरच्यांवर गंभीर आरोप केले आहेत. आपण पळून गेल्यामुळे माझ्या घरच्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे आपणाला पोलिसांचं सरंक्षण मिळावं अशी मागणीही या मुलीने पोलिसांकडे केली आहे.

हेही पाहा- आजोबांनी विचारलेल्या विचित्र प्रश्नापुढे झाली गुगलची बोलती बंद; Video पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल

अंजली मिश्रोली चौक येथील एका कोचिंग सेंटरमध्ये जात होती. यावेळी तिथे शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या चंदन नावाच्या मुलावर ती प्रेम करु लागली. अंजली जवळपास तीन वर्षापासून चंदनकडे शिकण्यासाठी जात होती. अशातच अंजली आणि चंदनने १२ डिसेंबर रोजी पळून जाऊन लग्न केलं. तर अंजलीच्या वडिलांनी आपल्या मुलीचं अपहरण केल्याचा गुन्हा चंदनसह अन्य पाच जणांवर केला. आपल्या प्रियकराविरोधात तक्रार दाखल झाल्याची माहिती मिळताच अंजलीने तिच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप करत आपण स्वत:हून चंदनबरोबर पळून आल्याचं सांगितलं आहे. शिवाय घरच्यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचंही तिने एका व्हिडीओद्वारे सांगितलं आहे.