Waqf Bill Nitish Kumar Video : लाईटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे आढळून आले. त्यात वक्फ विधेयकाला समर्थन न केल्याबद्दल एका तरुणाने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा दावा केला आहे. पण, खरंच अशी कोणती घटना घडली का याविषयी सत्य जाणून घेऊ….

काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर @blochirfan51 ने त्याच्या प्रोफाइलवर दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह व्हिडीओ शेअर केला आहे.

इतर युजर्सदेखील अशाच दाव्यासह व्हिडीओ शेअर करीत आहेत.

तपास:

व्हिडीओमधून मिळालेल्या कीफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च करून आम्ही तपास सुरू केला. त्यामुळे आम्हाला काही बातम्या आढळून आल्या आहेत. द इंडिया टाइम्सने दोन वर्षांपूर्वी हा व्हिडीओ पोस्ट केला होता.

https://www.indiatimes.com/videos/politics/nitish-kumar-attacked-by-man-during-function-at-hometown-565541.html

बातम्यांमध्ये असे म्हटले आहे की, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर रविवारी त्यांच्या मूळ गावी गृहनगर, बख्तियारपूर येथे एका व्यक्तीने हल्ला केला, ही सुरक्षेतील मोठी चूक होती. हल्ला करणारी व्यक्ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्याला अटक करण्यात आली आहे आणि सध्या तो पोलिस कोठडीत आहे, असे सूत्रांनी सांगितले. राज्यमंत्री अशोक चौधरी म्हणाले, “ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या लोकांकडून चूक झाली होती. याची चौकशी झाली पाहिजे”.

ही बातमी २७ मार्च २०२२ रोजी एनडीटीव्हीच्या वेबसाइटवरदेखील प्रकाशित झाली आहे.

https://www.ndtv.com/india-news/on-camera-nitish-kumar-attacked-by-man-during-function-at-hometown-2846382

आम्हाला यासंबंधीचे व्हिडीओ रिपोर्टदेखील सापडले.

वृत्तानुसार, हल्लेखोराला नंतर मानसोपचारासाठी पाटणा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल (PMCH) मध्ये पाठविण्यात आले.

https://www.ndtv.com/india-news/man-who-attacked-nitish-kumar-sent-for-psychiatric-treatment-police-2850584

निष्कर्ष :

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ अलीकडील नाही, तर तो २०२२ चा आहे. या व्हिडीओचा अलीकडील वक्फ विधेयक दुरुस्तीशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.