सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल हे सांगता येत नाही. शिवाय जे व्हिडीओ नेटकऱ्यांचे मनोरंजन करतात असेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. शिवाय देशातील नागरिकांचा वाढता सोशल मीडियाचा वापर पाहून अनेक लोक आपापली कला सादर करताना त्याचे रील्स बनवून सोशल मीडियावर शेअर करत असतात. ज्यामुळे त्यांना पैसेही कमावता येतात आणि ते फेमसही होतात. त्यामध्ये कधी लावणी तर कधी ऑर्केस्ट्रामधील डान्सचे व्हिडीओ व्हायरल होत असतात.
सध्या अशाच एका ऑर्केस्ट्रामधील डान्सचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये स्टेजवर अनेक मुली भोजपुरी गाण्यांवर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. त्या डान्स करत आहेत आणि डान्सचा खूप आनंदही घेत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. तसंच तिथे उपस्थित लोक डान्स करणाऱ्या मुलींचे व्हिडिओही बनवत भोजपुरी गाण्यांवरही डान्स करत आहेत.
हेही पाहा- Video: ढोल-ताशांचा आवाज ऐकून महिलांचा स्वत:वरील ताबा सुटला; चक्क जमिनीवर लोळत केला भन्नाट डान्स
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक मुलगी शॉर्ट्समध्ये चष्मा घालून डान्स करत असल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ जुना पण सध्या तो पुन्ही ट्रेंडमध्ये आला असून तो नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आहे.
व्हिडीओ का होतोय व्हायरल-
हेही पाहा- हेही पाहा- एका रात्रीत एक दोन नव्हे तब्बल ६ हजार २४३ कोटींचा बनला मालक, निमित्त ठरली ‘ही’ एक गोष्ट
या व्हिडिओमध्ये मुली स्टेजवर डान्स करताना दिसत आहेत. सर्व मुली गाण्यावर डान्स करताना मस्तीही करत आहेत. एक मुलगी तिच्या अप्रतिम हसण्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. शिवाय तिच्या भन्नाट डान्सच्या स्टेपमुळे अनेकांना हा व्हिडिओ खूप आवडला असून ते हा व्हिडीओ शेअरही करत आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत तर नेटकरी तो पुन्हा पुन्हा पाहताना दिसत आहेत. तर हा डान्स पाहून अनेकांना मराठमोठ्या गौतमी पाटीलचाही आठवण आल्याचं नेटकरी म्हणत आहेत.