रेल्वेने प्रवास करताना जर तुम्हालाही ट्रेनच्या दरवाज्यावर बसण्याची सवय असेल, तर हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच. सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्या मोबाईलमध्ये गाणे लावून ट्रेनच्या दरवाजावर बसलेला असता तो मोबाईल तुमची डोळ्यांची पापणी लवण्याच्या आतच लंपास होऊ शकतो. अशाच एका घटनेचा व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओमध्ये मोबाईल फोन इतक्या वेगाने चोरलाय की तुम्हाला स्वतःला सुद्धा कळणार नाही. स्लो मोशनमध्ये हा व्हिडीओ पाहिल्यावर ही घटना कशी घडली हे लक्षात येतं.
हा व्हिडीओ बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यातला असल्याचं सांगण्यात येतंय. या व्हिडीओमध्ये दोन मुलं ट्रेनच्या दरवाज्याजवळ बसलेले दिसत आहेत. ट्रेन एका पुलावरून जात आहे. ही ट्रेन पुलावरून नदी ओलांडत असताना दोघांपैकी एक मुलगा हा त्याच्या मोबाईलवरून नदीचा व्हिडीओ बनवू लागतो. दरम्यान काही वळाने नक्की काय घडलं हे कळण्याच्या आतच त्या मुलाच्या हातातून मोबाईल गायब झाला. एवढ्या लवकर मोबाईल कसा गायब झाला हे देखील कळलं नाही. तो मुलगा मागे वळून पाहतो आणि म्हणतो की मोबाईल हिसकावून घेतला… त्याच्या हातात फक्त हेडफोन उरला होता ज्याने तो गाणे ऐकत होता.
आणखी वाचा : दीक्षांत सोहळ्यात दूरवरून असलेल्या बापाला पाहून लेकाचे अश्रू अनावर, VIRAL VIDEO पाहून भावूक व्हाल
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : सायकल चालवता चालवता गोरिला धापकन खाली पडला, रागात त्याने काय केलं? पाहा VIRAL VIDEO
स्लो मोशनमध्ये व्हिडीओ पाहिल्यावर पुलावर बसलेला एक मुलगा आधीच बसलेला होता, ज्याने क्षणार्धात मोबाईल हिसकावल्याचं दिसून येतं. ट्रेन चालू असल्यामुळे चालत्या ट्रेनमधून नदीत उडी मारून आपला मोबाईल कोणीही वाचवायला जाणार नाही, त्यामुळे या चोरट्यांचे काम आणखी सोपे झाले. तुम्हाला सुद्धा ट्रेनच्या दरवाज्याजवळ किंवा खिडकीबाहेर मोबाईल, सामान घेऊन उभं राहण्याची सवय असेल तर आताच सावधान व्हा. अशा घटना आपल्याला भविष्याचा इशारा देतात. अन्यथा तुमचा सुद्धा मोबाईल चोरीला जाऊ शकतो आणि या व्हिडीओतल्या मुलाप्रमाणे तुम्ही सुद्धा फक्त बघतच राहाल.