बिहारमध्ये सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये बिहारमध्ये सातत्याने राजकीय घडामोडी घडतच असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. या घडामोडी प्रामुख्याने सत्ताधारी गटात घडताना पाहायला मिळाल्या. या सगळ्या घडामोडींच्या केंद्रस्थानी होते बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार. कधी भाजपासोबत तर कधी लालू प्रसाद यादव यांच्या राजदसोबत नितीश कुमार यांनी आघाडी-युतीचा खेळ करत वारंवार बाजू बदलल्या. आता पुन्हा एकदा नितीश कुमार राजदला सोडून भाजपासोबत जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांच्या या धोरणांवर सोशल मीडियावर तुफान मीम्स व्हायरल होऊ लागले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नितीश कुमारांचा आठ वेळा शपथविधी!

देशातल्या काही मोजक्याच उदाहरणांपैकी नितीश कुमार असे एक नेते आहेत, ज्यांनी आजतागायत ८ वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पण या ८ कार्यकाळांमध्ये त्यांच्यासोबत भाजपा, राजद असे वेगवेगळे सहकारी सत्तेत होते. नितीश कुमार यांच्या या धोरणामुळे त्यांच्यावर विरोधकांकडून सातत्याने ‘पलटू कुमार’ अशी खोचक टीकाही केली जाते. २००० साली नितीश कुमार यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. २०१३ पासून गेल्या १० वर्षांत त्यांनी प्रत्येकी दोन वेळा भाजपा व आरजेडीशी फारकती घेऊन नव्याने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

बिहारमध्ये मोठ्या घडामोडी; नितीश कुमार सरकारनं २२ आयएएस, ४५ इतर अधिकाऱ्यांची केली बदली!

सोशल मीडियावर तुफान मीम्स व्हायरल!

दरम्यान, आता पुन्हा एकदा राजदला पाठ दाखवून नितीश कुमार भाजपासोबत जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. नव्याने स्थापन होणाऱ्या सरकारमध्येही नितीश कुमारच मुख्यमंत्री असतील तर भाजपाचे दोन उपमुख्यमंत्री असतील, असं सूत्र ठरल्याचंही बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर तुफान मीम्स व्हायरल होत आहेत. काहींनी नितीश कुमारांच्या या भूमिकांची तुलना प्रेमाशीही केली आहे!

काहींनी नितीश कुमार सातत्याने भाजपा व राजदशी करत असलेल्या चर्चांवरून मीम शेअर केलं आहे.

एका युजरनं एक्सवर व्हिडीओ शेअर केला असून त्यात नितीश कुमार यांची तुलना फोनवर बोलणाऱ्या एका व्यक्तीशी केली आहे.

दरम्यान, एका युजरनं थेट नितीश कुमार व अमित शाह यांच्या जुन्या विधानांचा व्हिडीओ शेअर केला आहे.

“नितीश कुमार जगातले असे एकमेव राजकीय नेते आहेत, जे मुख्यमंत्रीपदी असताना मुख्यमंत्री बनण्यासाठी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतात जेणेकरून पुन्हा त्यांना मुख्यमंत्रीपदावर बसता येईल”, असं म्हणत एका युजरनं पोस्ट केली आहे.

बिहारच्या राजकारणात या सर्व घडामोडी घडत असताना पुन्हा एकदा पूर्वी कोण काय म्हणालं होतं? आत्ता कोण काय म्हणत आहे? आणि यापुढे कोण काय म्हणणार आहे? याची खुमासदार चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे!

Live Updates