Viral video: कुटुंबानंतर शाळा हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक मोठं विश्व असतं. अनेक चांगल्या गोष्टींची शिकवण ही शाळेतून मिळत असते. पण शाळेचे ते दिवस एकदा आयुष्यातून गेले की पुन्हा येत नाहीत. शाळेतील पहिला दिवस, मित्र-मैत्रिणींसोबत मिळून खाल्लेला डब्बा, मैदानावरचे खेळ, परीक्षेत केलेली कॉपी, तास सुरु असताना चोरी खालेला खाऊ आणि गप्पा , सरांची बोलणी, मार अशा अनेक गोष्टी सरकन डोळ्यासमोर येतात. यामुळे शाळेचे दिवस हे खरचं खूप भारी असतात.शाळेत शिकत असताना ‘वर्गातील बेंच वाजवणे’ या गोष्टीची एक वेगळीच क्रेझ होती. आपण सगळ्यांनीच शाळेत असताना बेंच वाजवला आहे, अशाच काही मुलांचा शाळेतील मुलांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शाळा म्हणजे जीवनातला सर्वाधिक सुंदर क्षण आणि टेंशन फ्री आयुष्य, शाळेतील मुलांचे आजवर अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. तुम्ही देखील त्यांचे बरेच व्हायरल व्हिडीओ पाहिले आतील. अशात सध्या शाळेतील मुलांचा ढोल ताशा वाजवतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये सर्व विद्यार्थी जबरदस्त ढोल वाजवत आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमचे शाळेतल दिवस नक्की आठवतील..

हा व्हिडीओ बिहारमधील असल्याचे समजले आहे. शाळेतीलच एका शिक्षकाने या विद्यार्थ्यांचा व्हिडीओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता ही एकूण चार मुलं आहेत. या पैकी दोघांनी बँचचा ढोल केला आहे. तर दुसऱ्या एका मुलाने कंपास बॉक्स समोर ठेवला असून हातात दोन पेन पकडले आणि हा यांचा ताशा. अशा पद्धतीने हे सर्वजण ढोलताशा वाजवतायत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल, दिवा स्टेशनवर रेकॉर्ड ब्रेक गर्दी! VIDEO व्हायरल…

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, काही व्हिडीओ हसवणारे असतात, काही व्हिडीओ रडवणारे असतात, तर काही व्हिडीओ हे भूकतकाळातील आठवणींना उजाळा देणारे असतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bihar school student drumming and played on bench in classroom dhol tasha video viral on social media srk