पालक आपली मुलं शिक्षकांच्या भरवशावर शाळेमध्ये दाखल करतात, पण आपल्या मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकालाच जर काही येत नसेल तर त्या मुलांच्या शिकण्याला आणि शाळेत जाण्याला काय अर्थ उरणार? असा प्रश्न पालकांनी उपस्थित करावा अशी एक घटना उघडकीस आली आहे. सध्या एका शिक्षकाचं हिंदी, इंग्रजी आणि गणिताचं ज्ञान पाहून अधिकारीच चकीत झालेत, तर पालकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
कारण, एका प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या गुरुजींना साधं ऑरेंज आणि पवन या शब्दांचे स्पेलिंग नीट लिहिता येत नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. तर या महाशयांच्या कार्यालयावरच ‘कार्यलल’ लिहिल्याचंही निदर्शनास आलं आहे. त्यामुळे आपल्या मुलांच्या शिक्षणाबाबत पालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
आणखी वाचा- नोकरी गेली तरी घाबरु नका! एक Idea शेअर करा अन् घरबसल्या कमवा लाखो रुपये; जाणून घ्या कसे
ही घटना बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील नवगचिया येथील प्राथमिक शाळेतील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १६ नोव्हेंबर रोजी नवगचियाचे गटविकास अधिकारी (BDO) गोपाल कृष्णन हे खैरपूर कडवा पंचायतीची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी पंचायतीच्या शाळांना भेट दिली. या पाहणी दरम्यान अधिकारी खैरपूर येथील प्राथमिक शाळेत पोहचले असता त्यांना तेथील एका कार्यालयाच्या भिंतीवर ‘कार्यलल’ लिहिलेलं दिसलं.
अधिकाऱ्यांनी घेतली शिक्षकाची शाळा –
त्यामुळे या अशुद्ध लेखनाविषयी त्या अधिकाऱ्यांनी शिक्षकाला जाब विचारला असता, “शाळेतील मुलांकडून ती चूक झाली असून, ती तत्काळ दुरुस्त करतो” असं आश्वासन शिक्षकांनी दिलं. पण अधिकारी तेथून माघारी फिरले नाहीत. त्यांनी त्या शिक्षकाचीच परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि ५० ला २ ने भाग घालवायला सांगितलं. त्यावेळी बोटावर सोडवायला येणाऱ्या या गणितासाठी शिक्षकाने खूप वेळ लावला, त्यामुळे अधिकारी चांगलेच संतापले.
शिवाय या अधिकाऱ्यांनी शिक्षकाला ऑरेंज शब्दाचं स्पेलिंग लिहायला लावलं तर या शिक्षकाने चक्क ‘ORIG’ असं लिहिलं. तर धक्कादायक बाब म्हणजे शिक्षकाने स्वत:च्या पवन नावाचं स्पेलिंग ‘POV’ असं लिहिलं. त्यामुळे अधिकाऱ्यांना या शिक्षकाच्या शिकवणीचा अंदाज आलाच, शिवाय या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे पालकांनी देखील संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, “या शिक्षकालाच काही येत नाही तर तो मुलांना काय शिकवणार आहे,” असा प्रश्न देखील नागरिकांनी उपस्थित केला आहे. या घटनेवर बीडीओ अधिकाऱ्यांनी शाळेतील असुविधांबाबत नाराजी व्यक्त करत या घटनेची माहिती उच्च अधिकाऱ्यांकडे पाठविणार असल्याचं सांगितलं आहे.