एसडीएम ज्योती मौर्य आणि आलोक यांच्या प्रकरणाची सध्या देशभरात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. शिवाय अनेकांनी ज्योती यांची कृती अयोग्य असल्याचं म्हटलं आहे. तर ज्योती यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. या प्रकरणाचा परिणाम सध्या देशभरात पाहायला मिळत आहे. कारण या प्रकरणामुळे विवाहीत महिलांना शिक्षण घेण्यासाठी अडचणी येत असल्याचं कोहीजण म्हणत आहेत. अशातच आता आणखी एका महिलेने शिक्षक बनताच आपल्या नवऱ्याला धोका दिल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. बिहारमधील एका व्यक्तीने त्याच्या बायकोला शिकवलं आणि तिला शिक्षिका बनवलं, पण ती शाळेच्या मुख्याध्यापकाबरोबर पळून गेल्याचा आरोप तिच्या नवऱ्याने केला आहे.

मुख्याध्यापकाबरोबर बायको पळाली –

young girl fight with ola auto viral video
“ये आदमी पागल है”, तरुणीने रिक्षाचालकाला केली शिवीगाळ अन्…, पुढे जे घडलं ते खतरनाक, पाहा VIDEO
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Viral video of a daughter dancing in the hospital where her mother is admitted craze for reel
अशी मुलगी नसलेलीच बरी! आई रुग्णालयात दाखल असताना पोटच्या पोरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप
Anshula Kapoor talks about parents Boney Kapoor Mona Kapoor divorce
“माझे आई-वडील वेगळे झाल्यावर…”, पालकांच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूरची सावत्र बहीण
rishi kapoor was scared of raj kapoor
वडील घरी आले की घाबरून लपायचो, ऋषी कपूर कारण सांगत म्हणालेले, “ते खोलीत…”
Sarpanch husband caught cheating on his wife with girlfriend wife beats girlfriend video viral mp
आधी ड्रेस खेचला मग बुक्क्यांनी मारलं! सरपंच पतीला गर्लफ्रेंडबरोबर पाहून पत्नीने घातला राडा, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं
"Worked Overtime": Gen Z Employee's Excuse For Coming Late The Next Day Boss and employee chat viral on social media
PHOTO: “मी उद्या उशीराच येणार…” कर्मचाऱ्यानं बॉसला मेसेज करत थेटच सांगितलं; चॅट वाचून नेटकरी म्हणाले “बरोबर केलं जशास तसं”

मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण बिहारमधील समस्तीपूर येथील पटोरीमधील असल्याचे सांगितले जात आहे. वैशाली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या चंदनकुमारने आरोप केला आहे की, लग्नानंतर १२ वर्षांनी त्याने बायकोला शिकवलं, तिला शिक्षिका बनवलं, शिवाय यासाठी त्याने मजूरी काम केलं, प्रसंगी कर्जही काढले. मात्र, बायको शिक्षिका बनताच शाळेच्या मुख्याध्यापकाबरोबर पळून गेली. शिवाय ते मागील वर्षीच्या दुर्गापूजेपासून फरार असल्याचा आरोपही चंदनने केला आहे.

हेही पाहा- Viral video: लिफ्टमध्ये अडकले माय-लेक, इंदोर पोलिसांनी दोन तासांनंतर केली सुखरुप सुटका

नवऱ्याने मजुरी करुन बायकोला शिकवलं –

चंदनने सांगितले की, १३ वर्षांपूर्वी सरिताबरोबर त्याचे लग्न झाले होते. सरिताला लग्नानंतरही शिक्षण घ्यायचे होते. यासाठी त्याने मजुरीचे काम केले, कर्ज घेतले आणि सरिताला शिकवले. त्यानंतर ती शिक्षिका बनली आणि २०२२ मध्ये तिला एका प्राथमिक शाळेत नोकरीही मिळाली. पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत चंदनने म्हटले की, शाळेचा मुख्याध्यापक राहुल कुमार सरितावर लक्ष ठेवून होता. सुरुवातीला चंदनकुमार स्वतः सरिताला शाळेत सोडायला जायचा, पण नंतर मुख्याध्यापकाने त्याच्या घराजवळ सरिताला भाड्याने घर मिळवून दिले. एवढेच नव्हे तर चंदनने तक्रारीत या दोघांमध्ये संबंध असल्याचंही म्हटलं आहे. मात्र, मुख्याध्यापकांनी आपल्यावर लावलेले सर्व आरोप खोटे असल्याचं सांगत फेटाळले आहेत.

हेही पाहा- “तो न्याय मागायला आलाय”, शरीरात सुशांत सिंह राजपूतचा आत्मा शिरल्याचा महिलेचा दावा; म्हणाली, “माझा पुर्नजन्म…”, पाहा Viral Video

तर हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद वाटत असल्याचे बीडीओ यांचे म्हणणे आहे. तसेच शिक्षिका फरार नाही तर तिने २ महिन्यांपासून रजेचा अर्ज दिला असून ती सध्या शाळेत येत नाही. शिवाय तिच्या पगारातही कपात करण्यात आली आहे. चंदनकुमारने सांगितले की, त्याला १२ वर्षांची मुलगी आणि ७ वर्षांचा मुलगादेखील आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. मात्र या तक्रारीमुळे आणखी एक ज्योती मौर्य आणि आलोक यांच्यासारखं प्रकरण समोर आल्याने सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरु आहे.