बिहारमधील एका आईने पोटच्या मुलाचे रडणे थांबवण्यासाठी चक्क फेवीक्वीकचा वापर केला आहे. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. बिहारमधील छपरा गावात ही घटना घडली आहे. आपल्या बाळाला शांत करण्यासाठी आईने त्याच्या ओठांवर फेवीक्वीक लावले. ज्यामुळे त्या बाळाचे ओठ ऐकमेकांना चिटकले आणि रडणे थांबले. बाळाच्या रडण्याला कंटाळून या महिलेने हा प्रकार केला असल्याचे समोर आले आहे.
बाळाच्या वडिलांना हे कळताच त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. त्यांनी तातडीने बाळाला दवाखान्यात दाखल केले. आता बाळाची तब्बेत ठीक असल्याचे समोर आले आहे. बाळाचे वडील कामाहून परत येताच त्यांना बाळ शांत शांत वाटले. तसेच त्याच्या तोंडातून फेस येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच पत्नी शोभाला याबाबत विचारले. त्यावर तिने ‘बाळ नेहमीच रडत असते. आता त्याच्या ओठांवर फेवीक्वीक लावले असल्याने तो रडणार नाही असे उत्तर दिले. हे ऐकताच बाळाच्या वडिलांना धक्काच बसला. त्यांनी फेवीक्वीक धुवून काढण्याचा प्रयत्न केला परंतु ते अयशस्वी झाले. त्यांनी तातडीने बाळाला दवाखान्यात दाखल केले. आता मुलाच्या जीवाला धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.