सोशल मीडियावर मागील अनेक दिवसांपासून बरेलीचे एसडीएम ज्योती मौर्य आणि आलोक मौर्य यांची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. शिवाय ज्योती मौर्य प्रकरणामुळे अनेक महिलांना लग्नानंतर शिक्षण घेणं अवघड झाल्याचं बोललं जात आहे. अशातच आता आणखी एका ज्योतीचे असेच प्रकरण बिहारमधून समोर आले आहे. ज्यामध्ये पत्नी सब इन्स्पेक्टर झाल्यानंतर तिने पती आणि मुलांना सोडून आपल्या बॅचमेटबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती जनसत्ताने दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण बिहारमधील मुझफ्फरपूर येथील असून घटनेतील पतीचे नाव प्रियरंजन आणि पत्नीचे नाव ज्योती असे आहे. महत्वाची बाब म्हणजे या दोघांनी पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. दोघेही एकाच परिसरात राहत असल्याने एकमेकांच्या प्रेमात पडले आणि २००९ मध्ये लग्न झाल्यानंतर दोघेही नोकरी करू लागले, पण ज्योतीला पुढे शिक्षण घ्यायचे होते. अशा परिस्थितीत स्पर्धा परीक्षेचा तयारीसाठी प्रियरंजनने तिला कोचिंगदेखील लावले.

hemal ingle bridal to be party
Video : ‘नवरा माझा नवसाचा २’ फेम अभिनेत्री लवकरच अडकणार विवाहबंधनात, मैत्रिणींसह केली Bride To Be पार्टी
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
army man killed his wife for immoral relationship and dead body throw in river
विवाहित सैनिकाचा तरुणीवर जडला जीव… पत्नी अडथळा ठरत असल्याने थेट नदीत…
Father daughter kanyadan emotional video goes viral father daughter bonding video
“हा क्षण का असतो मुलींच्या आयुष्यात?” लग्न ठरलेल्या प्रत्येक मुलीनं आणि तिच्या वडिलांनी पाहावा असा VIDEO
Child Marriage, Supreme Court, Child Marriage Prevention Act,
बालविवाहाचा फेरा : भारत मुक्त कधी होईल?
Pimpri, Female computer operator bribe, computer operator bribe Female, bribe,
पिंपरी : सहाशे रुपयांची लाच घेताना संगणक चालक महिला अटकेत

हेही पाहा- भ्रष्ट अधिकाऱ्याचा विचित्र प्रताप, लाच घेताना पकडताच तोंडात कोंबल्या नोटा, बाहेर काढणाराच्या बोटाला चावला, Video व्हायरल

इतकंच नव्हे तर ज्योतीच्या कोचिंगसाठी प्रियरंजन पाटण्याला शिफ्ट झाला. तिथे या दोघांची सोमेश्वर नावाच्या व्यक्तीशी भेट झाली. सोमेश्वर आणि ज्योती एकत्र अभ्यास करू लागले आणि परीक्षेची तयारी करू लागले. मात्र, आता सब इन्स्पेक्टर झाल्यानंतर ज्योतीने तिला पती प्रियरंजनला सोडून दुसऱ्या कोणाबरोबर तरी राहायचं असल्याचं सांगितलं आहे.

हेही पाहा- कष्टाचं चीज झालं! डिलिव्हरी बॉयचं काम करता करता तो बनला सरकारी अधिकारी; कौतुक करण्यासाठी ‘Zomato’चं खास ट्विट, फोटो Viral

मिळालेल्या माहितीनुसार, प्रियरंजनने पत्नी ज्योतीला नोकरी लावण्यासाठी जमीन विकली, मित्रांकडून कर्ज घेऊन ४० लाख रुपये खर्च केले. इतकंच नाही तर पतीने पत्नीचा मित्र सोमेश्वर यालाही पैसे देऊन अभ्यासात मदत केली, मात्र सब इन्स्पेक्टर झाल्यानंतर ज्योतीने पतीला सोडून आपल्या सब इन्स्पेक्टर असलेल्या बॅचमेटकडे राहणार असल्याचं म्हणत आहे. वृत्तानुसार, पतीने आरोप केला आहे की आता पत्नी ज्योती त्याला एका प्रकरणात अडकवण्याची आणि जीवे मारण्याची धमकी देत ​​आहे. तर पत्नीचे म्हणणे आहे की, पतीचे कुटुंबीय तिला त्रास द्यायचे, अनेक समस्यांना तोंड देत ती इन्स्पेक्टर झाली असून आता तिला तिचा पहिला पती प्रियरंजनबरोबर राहायचे नाही.