सोशल मीडियावर मागील अनेक दिवसांपासून बरेलीचे एसडीएम ज्योती मौर्य आणि आलोक मौर्य यांची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. शिवाय ज्योती मौर्य प्रकरणामुळे अनेक महिलांना लग्नानंतर शिक्षण घेणं अवघड झाल्याचं बोललं जात आहे. अशातच आता आणखी एका ज्योतीचे असेच प्रकरण बिहारमधून समोर आले आहे. ज्यामध्ये पत्नी सब इन्स्पेक्टर झाल्यानंतर तिने पती आणि मुलांना सोडून आपल्या बॅचमेटबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती जनसत्ताने दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण बिहारमधील मुझफ्फरपूर येथील असून घटनेतील पतीचे नाव प्रियरंजन आणि पत्नीचे नाव ज्योती असे आहे. महत्वाची बाब म्हणजे या दोघांनी पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. दोघेही एकाच परिसरात राहत असल्याने एकमेकांच्या प्रेमात पडले आणि २००९ मध्ये लग्न झाल्यानंतर दोघेही नोकरी करू लागले, पण ज्योतीला पुढे शिक्षण घ्यायचे होते. अशा परिस्थितीत स्पर्धा परीक्षेचा तयारीसाठी प्रियरंजनने तिला कोचिंगदेखील लावले.
इतकंच नव्हे तर ज्योतीच्या कोचिंगसाठी प्रियरंजन पाटण्याला शिफ्ट झाला. तिथे या दोघांची सोमेश्वर नावाच्या व्यक्तीशी भेट झाली. सोमेश्वर आणि ज्योती एकत्र अभ्यास करू लागले आणि परीक्षेची तयारी करू लागले. मात्र, आता सब इन्स्पेक्टर झाल्यानंतर ज्योतीने तिला पती प्रियरंजनला सोडून दुसऱ्या कोणाबरोबर तरी राहायचं असल्याचं सांगितलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रियरंजनने पत्नी ज्योतीला नोकरी लावण्यासाठी जमीन विकली, मित्रांकडून कर्ज घेऊन ४० लाख रुपये खर्च केले. इतकंच नाही तर पतीने पत्नीचा मित्र सोमेश्वर यालाही पैसे देऊन अभ्यासात मदत केली, मात्र सब इन्स्पेक्टर झाल्यानंतर ज्योतीने पतीला सोडून आपल्या सब इन्स्पेक्टर असलेल्या बॅचमेटकडे राहणार असल्याचं म्हणत आहे. वृत्तानुसार, पतीने आरोप केला आहे की आता पत्नी ज्योती त्याला एका प्रकरणात अडकवण्याची आणि जीवे मारण्याची धमकी देत आहे. तर पत्नीचे म्हणणे आहे की, पतीचे कुटुंबीय तिला त्रास द्यायचे, अनेक समस्यांना तोंड देत ती इन्स्पेक्टर झाली असून आता तिला तिचा पहिला पती प्रियरंजनबरोबर राहायचे नाही.