Uttar pradesh Accident Viral Video: रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे. एका इ-रिक्षाचालकाच्या चुकीमुळे एका २१ वर्षीय बाईकचालकाला आपला जीव गमवावा लागला आहे. इ-रिक्षाचालकाची एक चूक आणि तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे एका पुलावर दुपारी १२.४० वाजता घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ई-रिक्षा चालक वरदळीच्या रस्त्याच्या मधोमध थांबलेला आणि नंतर अचानक यू-टर्न घेत असल्याचे दिसत आहे. तेवढ्यात समोरुन येणार दुचाकीचालक ई-रिक्षाला धडकतो आणि तरुण रस्त्यावर कोसळतो. ही धडक इतकी भीषण होती की, तरुणाचा जागीच जीव गेला. या अपघातानंतर आजूबाजूच्या लोकांनी तरुणाला रुग्णालयात नेले मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> दूध पाजताना ८ महिन्यांची चिमुकली हातातून सटकली अन् पत्र्यावर अडकली; मृत्यूला हरवलेल्या बाळाचा VIDEO चमत्कारापेक्षा कमी नाही

अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आकाश सिंग असून हा एका खासगी कंपनीत कामाला असून शनिवारी तो काही कामानिमित्त गेला होता. यावेळी दुपारी घरी परतत असताना ही घटना घडलीय. पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे किडगंज पोलिस ठाण्यात ई-रिक्षाचालकाविरुद्ध पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडीओ शेअर केले जातात. ज्यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे, तुम्ही सदैव सावध राहा. @Bobbysingh1239_ नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हि़डीओ पोस्ट करण्यात आला असून, या व्हिडीओला लोक वारंवार पाहात आहेत. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.